दरम्यान, गुहागर-विजापूर महामार्गाचे काम गत दोन वर्षे सुरू असून अजूनही कोयना भागातील रस्त्याचे काम अपूर्ण आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. मात्र संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. संबंधित विभाग अजून किती बळी घेणार, असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.
- चौकट
अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
दरम्यान, कोयना भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी कोयना पोलीस ठाण्याला राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकारी व अभियंत्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत निवेदन दिले आहे. या भागातील प्रमुख कार्यकर्त्यांनी २३ ऑक्टोबर रोजी खड्डे भरण्यासाठी हेळवाक येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. निवेदनावर दत्तात्रय कदम, दयानंद नलवडे, शैलेद्र शेलार, प्रदीप पाटील, बापू देवळेकर, सचिन कदम, आदींच्या सह्या आहेत.