अमोल मोहन डुबल, रेखा मोहन डुबल, मोहन रामचंद्र डुबल (सर्व रा. राजमाची, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. तर दिनकर डुबल हे जखमी असून बालाजी डुबल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजमाची येथे दिनकर डुबल हे घराचे बांधकाम करत होते. यावेळी तेथे अमोल डुबल, रेखा डुबल, मोहन डुबल आले. त्यांनी शिवीगाळ करीत कोर्टाचा स्टे असल्याने तुम्ही बांधकाम करू नका, असे सांगितले. त्यावर बालाजी डुबल यांनी कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर अमोल डुबल याने तुम्हाला बांधकाम करू देणार नाही, असे म्हणून शिवीगाळ करत हातातील कोयत्याने दिनकर डुबल यांच्या हाताच्या तळव्यावर मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर अमोल याने तेथून पळ काढला. दिनकर डुबल यांच्यावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. बालाजी डुबल यांनी याबाबतची फिर्याद दिली असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.