शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

कऱ्हाड तालुक्यातील ऑनलाईन ग्रामसभा कोरोनापूर्तीअभावी तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 3:54 PM

CoronaVirus Online Satara Karad : कऱ्हाड तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सोमवारी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आयोजन केले होते. परंतु ऑनलाईन ग्रामसभा ही संकल्पना ग्रामीण भागातील लोकांना नवीन असल्याने किंवा याबाबत सविस्तर माहिती नसल्याने बहुतेक ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ऑनलाईन ग्रामसभेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.

ठळक मुद्देकऱ्हाड तालुक्यातील ऑनलाईन ग्रामसभा कोरोनापूर्तीअभावी तहकूब जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ऑनलाईन ग्रामसभेच्या तारखा जाहीर

कोपर्डे हवेली : कऱ्हाड तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींचे सोमवारी ऑनलाईन ग्रामसभा घेण्याचे आयोजन केले होते. परंतु ऑनलाईन ग्रामसभा ही संकल्पना ग्रामीण भागातील लोकांना नवीन असल्याने किंवा याबाबत सविस्तर माहिती नसल्याने बहुतेक ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आल्या. जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा ऑनलाईन ग्रामसभेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या.संपूर्ण जगाला गेल्या दीड वर्षांपासून वेठीस धरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात सामाजिक अंतराचा वापर करून मिटिंग, सेमिनार, ्अभ्यास वर्ग घेतले जात आहेत. अशाच पद्धतीने ग्रामपंचायतीचे ग्रामसभा घेण्याचे आयोजन बहुतेक ग्रामपंचायतींनी सोमवारी केले होते. यासाठी पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी निश्चित केला आहे.

या पंचेचाळीस मिनिटांच्या कालावधीत संपूर्ण सोपस्कार पार पाडून सर्व विषयांची माहिती तसेच मंजुरी घेण्याची आवश्यकता होती. यासाठी लोकसंख्येच्या पंधरा टक्के किंवा कमीत कमी शंभर लोकांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु ऑनलाईन मिटिंग किंवा ग्रामसभा ही कार्यप्रणाली ग्रामीण भागातील लोकांसाठी नवीन किंवा कोरोनाच्या दहशतीखाली वावरत असलेल्या लोकांना यामध्ये फारसा रस नसल्याने किंवा या ऑनलाईन सभेसाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे ॲप अशा संगणकीय प्रणालीची माहिती नसल्याने या सभेला ऑनलाईन उपस्थित राहता न आल्याने अनेक ग्रामसभेला कोरम पूर्ण न होऊ शकल्याने त्या तहकूब करण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरonlineऑनलाइन