नाटोशी : पाटण तालुक्यातील २६ गावात एकच गणेशमूर्ती बसवून गांवाच्या एकोप्याचे दर्शन घडविले आहे़ संबंधीत गावात राबविण्यात आलेल्या एक गाव एक गणपती योजनेतून अनावश्यक खर्चाच्या बचतीबरोबरच कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होत आहे़गणेशोत्सवाच्या दरम्यान मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांच्या उत्साह जास्त असतो या उत्साहातून कार्यकत्यांच्या स्पर्धेतून होणारी भांडणे, मारामारीचे प्रसंग उद्भवतात़ या गणेशोत्सव काळात कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिस यंत्रणेची असते. त्यांच्यावरही या काळात मोठया प्रमाणावर ताण येत असतो़ हा ताण टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून एक गांव एक गणपती संकल्पना राबविण्यात येते . जर एक गाव एक गणपती ही संकल्पना गावांनी राबविल्यास मंडळाच्या स्पर्धेतून होणारी भांडणे टाळली जावून शकतात़ त्याबरोबरच पोलिस यंत्रणेवरील बंदोबस्ताचा ताण हलका होण्यास मदत होते़ एक गाव एक गणपतीमुळे गावागावातील एकोपा कायम राहून गावात गणेशोत्सवादरम्यान विविध मंडळाव्दारे होणारा अनावष्यक खर्च टाळला़ आणि आपोआपच पोलिस प्रशासनावरील ताण हलका होतो. या हेतूने पोलिस दलामार्फत एक गांव एक गणपती योजना राबविण्यात येते़ यंदा तालुक्यातील 26 गांवातील गामस्थांनी स्वयंस्फूर्तीने एक गांव एक गणपती योजना राबवित आहे त्या माध्यमातून गावामध्ये एकच गणेषमूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आल्याचे सर्व गांव एक करण्यात यष आले आहे़ या योजनेमुळे गणेश उत्सोवा दरम्यान मंडळा मंडळातील स्पर्धेतून निर्माण होणारे वाद विवादातून होणारी हणामारीचे प्रसंग उद्भवत नाहीत़ (वार्ताहर) या गावांत आहेत एकच गणपती गरेवाडी, पाळेकरवाडी, जरेवाडी, हावळेवाडी येराडवाडी निन्हबे चिरबे, गोकूळ, गुरेघर, अांबेघर, दिक्षी, गुजाळी, झाकडे, वाडीकोतावडे, तामकणे, काळोली, कवरवाडी, लुगडेवाडी, म्हावषी, बिबी, सलतेवाडी, साखरी, केरळ, मणदुरे, दिवषी खुर्द, कवडेवाडी. (वार्ताहर)
२६ गावांत एकच गणपती!
By admin | Published: September 21, 2015 9:06 PM