सातारा : तीन निष्पाप बळी गेल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी घर मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी ‘डॉल्बी’चा थयथयाट मात्र, याप्रकरणापासून दूर ठेवला जात आहे. सोमवारी रात्री २५ मंडळावर आवाजाची मर्यादा ओलांडल्याबद्दल कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे यातील काही मंडळे साताऱ्यातील नेत्यांशी संबंधित आहेत. जास्तीत जास्त आवाज १२१ डेसीबल इतका मोजण्यात आला असला तरी भिंत कोसळण्याच्या घटनेशी या डेसीबलचा संबंध जोडण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.‘डॉल्बीमुळे घर पडले, हे सिद्ध करणे अवघड आहे.’ अशी मानसिकता असलेल्या प्रशासनाने याप्रकरणी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी विसर्जन मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी डॉल्बीचा आवाज मर्यादेपेक्षा प्रचंड प्रमाणात जास्त ठेवल्याचे उघड झाले आहे. सोमवारी रात्री विसर्जन मिरवणूक सुरू असताना राजपथावर इमारतीची भिंत कोसळून तिघांना प्राणास मुकावे लागले. डॉल्बीच्या हादऱ्याने भिंत कोसळल्याचा अनेक सातारकरांचा आक्षेप असल्याने मिरवणुकीतील डॉल्बी आणि कोणाचे डेसीबल किती याविषयाला यंदा मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. पोलिसांनी कारवाई केलेली मंडळे कोणती, कारवाई नेमकी कोणती होणार, या प्रश्नांबरोबरच भिंत कोसळण्यास कारणीभूत ठरलेली डॉल्बी नेमकी कोणाची, हा महत्त्वाचा प्रश्न सातारकरांच्या मनात आहे. तथापि नेमक्या कोणत्या डॉल्बीच्या हादऱ्याने भिंतीवर अखेरचा आघात केला, हे शोधून काढणे जितके कठीण आहे. तितकेच डॉल्बीला दुर्घटनेस जबाबदार धरून कारवाई करणेही कठीण आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. जास्त आवाज असल्यामुळे भिंत पडली, हे कायदेशीर कसे सिद्ध करायचे, असाही प्रश्न पोलिसांना भेडसावतोय. डॉल्बीधारकांवर आवाजाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करता येईल, परंतु जास्त आवाजामुळे दुर्घटना घडलेली भिंत पडली, याबाबतचा गुन्हा दाखल करता येणार नाही. असेही एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)कऱ्हाडातही कारवाई कऱ्हाड : गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीसह बेंजो व ध्वनीक्षेपकांचा अमर्याद वापर करण्यात आला़ ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केलेल्या अकरा मंडळांचे अध्यक्ष व वाद्यधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षकांना पाठविण्यात आल्याची माहिती उपअधीक्षक मितेश घट्टे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी सोमवारी अनेक मंडळांनी डॉल्बी, बेंजो यासह अन्य वाद्यांचा वापर केला़ पोलिसांनी वाद्याच्या ध्वनी तीव्रतेची तपासणी केली असता अकरा मंडळांनी मर्यादेचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले़ त्यानुसार गुरुवार पेठेतील संत रोहिदास मंडळ अध्यक्ष संजय रूद्राक्ष व डॉल्बीधारक अक्षय रावखंडे, शुक्रवार पेठेतील जय महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ देवरूखकर, ओम मंडळ अध्यक्ष राहुल ऊर्फ शशांक खराडे व वाद्यधारक प्रीतम तांबे, कामगार मंडळ अध्यक्ष संभाजी इंगवले व वाद्यधारक सनी ऊर्फ इंद्रजित कणसे, व्यापारी स्मृती मंडळ अध्यक्ष ओंकार पवार व वाद्यधारक विनायक शिंदे, नवजवान मंडळ अध्यक्ष राजकुमार नलवडे, मंगेश घोलप व वाद्यधारक आसिफ मुलाणी, आदिमाया मंडळ अध्यक्ष किरण मुळे व वाद्यधारक विजय कुंभार, मलकापुरातील शहीद भगतसिंग मंडळ अध्यक्ष नरेंद्र लोहार व वाद्यधारक दिनकर पवार, कऱ्हाडच्या बुधवार पेठेतील अण्णा भाऊ साठे मंडळ अध्यक्ष कैलास भिसे व वाद्यधारक जावेद मुल्ला, सूर्यवंशी मळ्यातील शिवतेज मंडळ अध्यक्ष रणजित सूर्यवंशी तसेच मलकापूरच्या शास्त्रीनगरमधील शिवशक्ती मंडळ अध्यक्ष दत्ता कुंभार व वाद्यधारक महादेव देसाई यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे़ यामुळे कऱ्हाड शहरातील कार्यकर्त्यांमध्ये खळबळ माजली आहे.(प्रतिनिधी)मंडळाचे नावअध्यक्षडॉल्बी मालकाचे नावजय जवानरोहित गवळ-वीर शैव कैकैय्याविजयकुमार तपासेगणेश शिंदेगुरुवार तालीमप्रकाश गवळीरजनी नागेबुधवार तालीम संघअरुण कवारेपंकज निकममहाराणा प्रतापसागर साळुंखेसुनील कांबळेदेशप्रेम, शनिवारपेठसचिन वायदंडेसोन्या बनकरन्यू हनुमानसंदीप भोसलेगणेश मिरगेनवयुग पंताचा गोटअमोल पवारमहेंद्र यादवबालगोपालविनायक क्षीरसागर संभाजी शेठेलोकमान्यसतीश माम्हणेदीपक मोरे (फलटण)जय बजरंग-अरुण बँडमहाराष्ट्र मंडळ्केतन साळुंखेमहाराष्ट्र मंडळमार्केड यार्डप्रवीण कांबळेमनोज शेंडेरितेश गणेश मंडळजगदीश शेठेरजनी नागेमंडईचा राजामहेश साळुंखेराधाकृष्ण बॅण्ड (राधाकृष्ण)माऊलीशिरीष कदमगणेश निकमसूर्यमतीरविंद्र ढोणेजयवंत कदमसाई गणेश अजय घाडगेतानाजी मिरगेवरसिद्धीअमर शिर्केतुकाराम जाधवकायदा काय म्हणतो..पर्यावरण कायद्याचे उल्लंघन केल्यानंतर ध्वनिप्रदूषण नियम २००० नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येतो. हा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर एक लाख दंड किंवा पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते, किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा एकाचवेळी होऊ शकतात.
पोलिसांच्या कचाट्यात सापडली नेत्यांचीच डॉल्बी!
By admin | Published: September 10, 2014 10:55 PM