दहिवडी : माण तालुक्यात शुक्रवारी ४७ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकांमध्ये सरासरी ७९.७० टक्के मतदान झाले. सर्वांत जास्त मतदान हे शंभुखेड येथे ९२ टक्के, तर शिंदी खुर्द येथे अवघे ३ टक्के मतदान झाले.
सकाळपासूनच मतदाराचा उत्साह जाणवत होता. ६१ पैकी १४ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४७ ग्रामपंचायतींमध्ये ३३६ जागांसाठी १४७ मतदान केंद्रे उभारली होती. ७३५ कर्मचारी व शंभर राखीव कर्मचारी, सात झोनल अधिकारी यांच्या देखरेखेखाली निवडणूक पार पडली. अनेक गावांत चुरस, तर काही ठिकाणी अनुउत्साह जाणवत होता. शिंदी खुर्द येथे अवघ्या एका जागेसाठी मतदान झाले. त्या ठिकाणी उमेदवारासह १५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळच्या सत्रात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. साडेअकरापर्यंत ३२ टक्के, दीडपर्यंत ५३, साडेतीनपर्यंत ७० टक्के, तर सायंकाळी साडेपाचपर्यंत सरासरी ८० टक्क्के मतदान झाले. २१२ जणांनी पोस्टल मताचा अधिकार बजावला.
तालुक्यातील प्रमुख गावांपैकी कुळकजाई येथे ७९ टक्के, देवापूरमध्ये ८६, शिंदी बुद्रुक ७६, पिंगळी खुर्द येथे ८२, पळसावडे ८७, गोंदवले खुर्द येथे ७२, कुकडवाडमध्ये ६६, डंगीरेवाडी ८९, कारखेल ८९, श्री पालवण ७६ टक्के मतदान झाले.
हस्तनपूरमध्ये ८३, पिंगळी बुद्रुक ७५, धामणी ८५, राणंद ८३, शिंगणापूर ६६, गोंदवले बुद्रुक ८०, वारुगड ८२, वरकुटे म्हसवड ८२, पिंपरी ८३, शेनवडीत ८०, शेवरी ८२, किरकसाल ८२, ढाकणीत ८६, शिरवली ७८, वाघमोडेवाडीत ८२, काळचौंडीत ७५ टक्के मतदान झाले. बोथे ८७, भांडवलीत ८२, जांभुळणी ८४, पर्यंती ७६, भालवडी ८०, मोगराळेत ८०, हिंगणीत ७४, वळईत ७७, दिवडी ७८, गटेवाडी ८३, सोकासन ८०, वडगांव ८७, तर पाणवानमध्ये ७८ टक्के मतदान झाले.
चौकट
सोमवारचा आठवडा बाजार रद्द
मतमोजणी सोमवार, दि. १८ रोजी नवीन शासकीय गोदाम खरेदी-विक्री संघाच्या पाठीमागे दहिवडी येथे होणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला आहे.