महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून आयोजित विविध कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.
यावेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्या मंगला गलांडे, गौरी चव्हाण, विद्याताई थोरवडे, कल्पना गायकवाड, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नगरसेवक सागर जाधव, नगरसेविका भारती पाटील, कमल कुराडे, स्वाती तुपे, माधुरी पवार, निर्मला काशिद, नंदा भोसले, अलका जगदाळे, गीतांजली पाटील, नूरजहाँन मुल्ला, आनंदी शिंदे, पूजा चव्हाण, माजी नगराध्यक्षा कल्पना रैनाक, रुपाली कराळे, सुनंदा साठे, सुनीता पोळ, महिला, नागरिक, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी महिला कर्मचारी, बचत गट, जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र याबाबतची माहिती उपस्थित सर्व महिलांना दिली. तसेच विविध स्तरावर काम करणाऱ्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. नागरिकांमध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये सकारात्मक बदल अभिप्राय नोंदविलेल्या व्यक्ती, नगरपालिका महिला अधिकारी व कर्मचारी, कोविडअंतर्गत मलकापूर शहर कोरोना मुक्तिसाठी अथक परिश्रम घेतलेले माजी सरपंच, नगराध्यक्षा, विद्यमान नगरसेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉक्टर व परिचारिका, आशा सेविका, पाणी पुरवठा, बचत गट, अंगणवाडी सेविका मदतनीस, आरोग्य महिला कर्मचारी या सावित्रीच्या लेकींना बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन ज्ञानदेव साळुंखे व शाहीन मनेर यांनी केले. महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण यांनी उपस्थितांचे आभार मानले.
फोटो :