पेट्री : सातारा शहराला पाणीपुरवठा करणाºया कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच सद्य:स्थितीत तलावात साडेपंधरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. कासचा एक व्हॉल्व्ह पूर्णत: उघडा पडला असून, पंधरा दिवसांपासून दुसºया व्हॉल्व्हमधून शहराला पाणी पुरवठा सुरू आहे. तलावात शिल्लक असलेला पाणीसाठा काटकसरीने वापरल्यास पावसाळ्यापर्यंत पुरणार आहे.
दरवर्षी कास तलावात २५ फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान पंधरा फुटापर्यंत पाणीसाठा शिल्लक होता. यंदा आजमितीला ही पाणीपातळी साडेपंधरा फूट एवढी आहे. शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दोन दिवसाला दीड इंच पाणी पातळी खालावत आहे. गतवर्षीपेक्षा अर्धा फूट पाणीसाठा तलावात शिल्लक असला तरी वातावरणात दिवसा उष्णतेच्या तीव्रतेचे प्रमाण अधिकाधिक वाढत असल्याने पाणी पातळी खालावत आहे. हा पाणीसाठा पावसाळ्यांपर्यंत टिकून राहावा, यासाठी तलावातून मुरून वाया जाणारे पाणी विद्युत मोटारीच्या सा'ाने उपसा करून पाटात सोडले जात आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा फूट जादा साठाएकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाºया कास तलावातील एक व्हॉल्व्ह उघडा पडला असून, सध्या दुसºया व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. साधारण एप्रिल महिनाअखेरीस दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अर्धा फुटाने पाणीसाठा जास्त शिल्लक आहे.सध्या कास तलावात पंधरा फूट सहा इंच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा.- जयराम कीर्दत, पाटकरी कास तलाव