शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
4
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
5
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
6
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
7
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
8
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
9
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
10
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
11
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
12
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
13
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
14
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
15
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
16
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
17
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
18
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
19
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
20
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान

प्रतिष्ठेसाठी खुल्या गटात अनेकांचे खुले आव्हान!

By admin | Published: October 10, 2016 12:04 AM

खुला प्रवर्गामुळे चुरस वाढणार : कऱ्हाड-पाटणच्या आजी-माजी आमदारांचे लक्ष; उमेदवारीसाठी अनेकांच्या हालचाली सुरू

कऱ्हाड : विधानसभेला पाटण मतदार संघाला जोडलेला; पण जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कऱ्हाड तालुक्यात समाविष्ट असणारा जिल्हा परिषद गट म्हणजे तांबवे. हा जिल्हा परिषद गट माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो; पण गत काही वर्षांत येथील पंचायत समिती गणाचे बुरुज ढासळण्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे आगामी निवडणुकीत इथली राजकीय समीकरणे नेमकी काय असणार, याच्या उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र खुल्या गटामुळे परस्परांना अनेकजण खुले आव्हान देतील, असे वाटते.तांबवे जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण पुरुष तर तांबवे व सुपने पंचायत समिती गणासाठीसर्वसाधारणमहिला आरक्षण निश्चित झाले आहे. त्यामुळे या गटातील निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे. गत निवडणुकीत सुरेखा पाटील यांनी उंडाळकर गटातर्फे बंडखोरी करीत काँगे्रसचा तेजस्विनी पाटील यांचा पराभव केला होता. तर तांबवे गणातूनही लक्ष्मण जाधव या उंडाळकर समर्थकांनी अपक्ष बाजी मारली होती. पण सुपने गणात काँगे्रसच्या प्रकाश वास्के यांनी विजय मिळविला होता.तत्पूर्वी २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत अण्णा पाटील यांनी प्रकाश पाटील यांचा पराभव करीत उंडाळकर गटाचा झेंडा फडकविला होता. त्यावेळी तेजस्विनी पाटील व रेखा कदम यांनी काँगे्रसच्या चिन्हावर यश मिळविले होते. तर २००२ मध्ये उंडाळकर काँगे्रसचे रघुनंदन बागवडे यांनी जिल्हा परिषदेचा गड राखला. मात्र, पंचायत समितीत पद्मिनी पाटील यांनी अपक्ष म्हणून तर विजय चव्हाण यांनी राष्ट्रवादीतून विजय मिळविला. विजय चव्हाण हे पंचायत समितीतील राष्ट्रवादीचे पहिले सदस्य म्हणून ओळखले जातात.आता मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दक्षिणचा गड अभेद्य ठेवणारे ‘काका’ आता माजी आमदार झाले आहेत. कऱ्हाड शहराचा दक्षिणेत समावेश झाल्याने मतदार संघाची समिकरणेही बदलली आहेत. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व आमदार आनंदराव पाटील यांच्या माध्यमातूनही येथे विविध विकासकामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे त्यांचीही ताकद वाढली आहे. अन हो आमदार आनंदराव पाटील यांचे मूळ विजयनगर गाव याच मतदार संघात येतेय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी येथे उंडाळकर गटाकडून प्रदीप पाटील तांबवे, डॉ. महेंद्र पाटील सुपने, माजी जिल्हा परिषद सदस्य अण्णा पाटील तांबवे, खरेदी-विक्री संघाचे संचालक हणमंतराव चव्हाण साजूर, रवींद्र ताटे यांची नावे चर्चेत आली आहेत. काँगे्रस पक्षाकडून बाजार समितीचे संचालक सुनील पाटील, माजी संचालक प्रकाश पाटील, सतीश पाटील तांबवे, राहुल पाटील यांची तर राष्ट्रवादीकडून अ‍ॅड. विश्वास निकम व माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. पण निवडणुकीचे अंतिम चित्र काय असणार यावर उमेदवारीची लॉटरी कोणाकोणाला लागणार हे स्पष्ट होईल. तोपर्यंत मोकळ्या खळ्यावरच्या गप्पा अशाच सुरू राहणारच. (प्रतिनिधी) पाटणचे नेते काय घेणार भूमिका ! तांबवे गट विधानसभेला पाटण विधानसभा मतदार संघात येत असल्याने या निवडणुकीवर शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे बारीक लक्ष राहणार आहे. आता पाटणच्या नेत्यांची इथल्या जनतेशी चांगली जवळीकही निर्माण झाली आहे. आता हे नेते इथल्या लोकांना ‘धनुष्यबाण’ उचलायला लावणार की ‘घड्याळाला’ चावी द्यायला सांगणार, हे आता सांगता येणार नाही. ‘सह्याद्री’चे कार्यक्षेत्र सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तांबवे जिल्हा परिषद गटाचा सगळा भाग येतो. त्यामुळे ‘उत्तर’चे आमदार अन् येथील लोकांच्यातही चांगलाच गोडवा आहे. त्यामुळे या निवडणुकीवर त्यांचाही पगडा राहणार, हे सांगायला नको. दक्षिण कऱ्हाडमध्ये बरेच लक्ष घातलेले उत्तरचे आमदार येथे नेमकी काय ‘साखर पेरणी’ करणार हे पाहावे लागेल. ४गत जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस अंतर्गत बाबा, काका गटातच लढत झाली. राष्ट्रवादी काँगे्रसच्या समर्थकांनी स्थानिक पातळीवर वेगवेगळे निर्णय घेतले. तर शंभूराज देसार्इंनीही पक्षीय चिन्हाचा आग्रह धरला नव्हता. त्यामुळे यावेळीही काँगे्रसच विरुद्ध उंडाळकर बंडखोर अशीच लढत बघायला मिळणार का? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.