खंडाळा : ‘खंडाळा ग्रामपंचायतीत केलेल्या विकासकामात खीळ घालण्याचा प्रयत्न नेहमीच विरोधकांकडून केला जात आहे. त्यांचा हा रचलेला डाव आपण सर्वांनी एकत्र येत हाणून पाडू,’ असा दावा पंचायत समितीचे सदस्य व पॅनेल प्रमुख अनिरुद्ध गाढवे यांनी केला. खंडाळा नगरपंचायत निवडणुकीचा काँग्रेस पक्षाच्या पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करताना ते बोलत होते. भैरवनाथ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून संपूर्ण शहरातून पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये कार्यकर्त्यांसह महिलाही सहभागी झाल्या होत्या. घोषणांनी खंडाळा शहर दुमदुमले होते. यावेळी झालेल्या कोपरा सभेत अजितअप्पा गाढवे, श्रीराम गाढवे, किरण खंडागळे, प्रकाश गाढवे, प्रल्हादराव खंडागळे, निवृत्ती खंडागळे, विलास खंडागळे, नितीन खंडागळे, मारुती खंडागळे, चंद्रकांत पवार, पांडुरंग खंडागळे, सागर गाढवे, ताराचंद गाढवे, अनिल गाढवे, यशवंत गुरव उपस्थित होते. यावेळी भैरवनाथ मंदिर, गणेश मंदिर, राजेंद्र विद्यालय चौक, शिवाजी चौक, संभाजी चौक अशी भव्य पदयात्रा काढण्यात आली. खंडाळा शहराची गरज पाहून मूलभूत विकासकामे करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. तरी विरोधकांकडून अनेक कामांमध्ये नेहमीच खीळ घालण्यचा प्रयत्न केला जात आहे. गावच्या सांस्कृतिक वैभवाची जपणूक करण्यासाठी मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला. याशिवाय खंडाळ्यात शेतकऱ्यांच्या मालकीचा साखर कारखाना उभा राहिला आहे. सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच सुरू आहे. त्यासाठी जनतेने पाठीशी राहावे, आणि विरोधकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडावे .(प्रतिनीधी)
खंडाळ््यात विरोधकांकडून
By admin | Published: November 18, 2016 11:05 PM