दहिवडी : माण बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला विचारात घेऊनच निर्णय घेऊ,’ असे आश्वासन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिले.
दहिवडी येथे माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी बोलत होते.
या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, उपसभापती तानाजी कट्टे, पंचायत समिती सदस्य नितीन राजगे, जिल्हा परिषद सदस्य बाबा पवार, माहिला आघाडीच्या कविता म्हेत्रे, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, माजी सभापती श्रीराम पाटील, अभय जगताप, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब काळे उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘पुढील विधानसभेला तोंड देण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या ताब्यात असल्या पाहिजेत. त्यामुळे राजकारणात आपले मूळ पक्के करण्याच्या या निवडणुका आहेत. ही मर्यादित मतांची निवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. लोकांना गृहीत धरून चालणार नाही, कारण माणच्या जनतेच्या मनात काय आहे, हे सहजासहजी समजत नाही.’
जिल्हाध्यक्ष सुनील माने म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांनाच संधी दिली जाईल. निवडणुकीत वेगळे काम करायचे आणि नेत्याच्या कानाला लागायचे यांना यापुढे थारा नाही, सर्व जिल्हा परिषद गटातील सक्षम उमेदवारांना संधी द्यावी, इतरांना वेगवेगळ्या ठिकाणी सामावून घेऊ.’
प्रभाकर देशमुख, विजय जगताप, रमेश शिंदे, अंगराज कट्टे, श्रीराम पाटील, दादासाहेब चोपडे आदींनी आपले विचार मांडले.
२७दहिवडी
दहिवडी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संवाद साधला. या वेळी सुनील माने, प्रभाकर देशमुख, मनोज पोळ, तानाजी कट्टे, कविता म्हेत्रे आदींची उपस्थिती होती. (छाया :नवनाथ जगदाळे)