जयकुमार गोरेंच्या भाजपप्रवेशास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 05:05 AM2019-06-17T05:05:09+5:302019-06-17T05:06:01+5:30
गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठराव प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला.
दहिवडी (जि.सातारा) : ‘माणचे कॉग्रेस आमदार जयकुमार गोरे यांना जनाधार राहिला नसल्यामुळे ते आता कधीच निवडून येणार नाहीत.
म्हणूनच ते भाजप प्रवेशासाठी धडपडत आहेत. जनाधार नसलेल्या गोरेंना भाजपने पक्षात घेऊ नये,’ असे स्पष्ट मत भाजपचे माण- खटाव विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष डॉ. महादेव कापसे यांनी व्यक्त केले. गोरे यांना भाजपात प्रवेश देऊ नये, असा ठरावही यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला.
दहिवडी येथील भाजप पक्ष कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या नियोजनार्थ भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
डॉ. कापसे म्हणाले, ‘जयकुमार गोरे यांचा काँग्रेसमध्ये सध्या दंडेलशाही कारभार सुरू आहे. अनेक निकटचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्षात, लोकांमध्ये त्यांचा जनाधार राहिलेला नाही. त्यामुळे त्यांना भाजपात घेतल्यास पक्षाशी प्रामाणिक असणाºया पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याची शक्यता नाही.’