कऱ्हाड : ‘सध्या देशातले वातावरण हे भाजप सरकारच्या विरोधात आहे; पण देशातल्या मोठ्या राजकीय विरोधी पक्षांना पॅरेलिसीस झालाय; काँग्रेस तर लोक स्वत:हून आपल्या हातात सत्ता देतील, याची वाट बघत बसले आहेत,’ अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले प्रकाश आंबेडकर गुरुवारी कोल्हापूरहून साताऱ्याला जात असताना कऱ्हाडात थांबून काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, प्रा. पुष्पलता सकटे, प्रकाश वायदंडे, जावेद नायकवडी, अप्पा बडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.आंबेडकर म्हणाले, ‘देशाची एकंदरीत परिस्थिती पाहता ती हाताबाहेर चालल्याचे दिसते. संविधानच अडचणीत आले आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी आमचा लढा आहे. त्यासाठी सर्वत्र फिरत असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर जात असून, गेल्या सत्तर वर्षांत ज्यांनी लोकसभेत पायही ठेवला नाही, अशा जाती-जमातीतील लोकांना लोकसभेत उमेदवारी देण्याचा आपला निर्धार आहे. जे आजवर सत्तेपासून वंचित राहिले आहेत. त्यांना सत्तेत आणण्यासाठीच आपली ही नवीन लढाई आहे.’त्यामुळेच कर्नाटकात काँगे्रसचा पराभव !‘कर्नाटक राज्यात शिवम आयोग लागू करून त्याची अंमलबजावणी तातडीने करा, अशी आमची मागणी होती. मात्र कर्नाटकातील काँगे्रसच्या मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्याचाच परिणाम म्हणून कर्नाटकात काँगे्रसचा पराभव झाला,’ असेही आंबेडकर एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.ते आहेत तेथेच सुखी आहेतबहुजन आघाडीत आपण सर्वांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करताय, ही बाब चांगली आहे. मग दलितांचे नेतृत्व करणाºया तुमच्या जुन्या मित्रांना बरोबर घेणार का? याबाबत छेडले असता, ‘ते आहेत तेथेच सुखी आहेत,’ असा टोला रामदास आठवलेंचे नाव न घेता प्रकाश आंबेडकरांनी लगावला....तर हा सुद्धा बदल कराआपल्याला राज्यात अन् देशात राजकीय बदल घडवून आणायचा आहे. त्यामुळे आपण स्वत:सुद्धा काही बदल केले पाहिजेत, असे सांगत स्वागतला पुष्पगुच्छ, बुके देत बसू नका, हा सुद्धा बदल तुम्ही स्वत:त करा, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी आणलेले बुके, हार स्वीकारणे टाळले.