योगेश घोडके।मुरघासची पद्धत ही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही करत आहोत. मुरघासमुळे जनावरांच्या दुधातही वाढ होते. तसेच उन्हाळ्यात चारा नसताना मुरघासचा उपयोग फायदेशीर ठरतो. त्यामुळे चाऱ्याची गंभीर समस्या जाणवत नाही. सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केला तर चाºयाचा प्रश्न उपस्थित होणार नाही.- शेखर अडसूळ, कापशी
सातारा : ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यात चारा प्रश्न गंभीर होत असतो. त्यामुळे बळीराजा गंजी स्वरुपात चाºयाची साठवणूक करत असतो. मात्र, ही गंजी डोंगराच्या पाथ्याशी असल्याने डोंगराला या ना त्या कारणाने वणवा लागतो. त्यामुळे गंजीला पर्याय ‘मुरघास’ आहे.सध्या डोंगरांना वणवा लागण्याचे प्रमाण मोठे आहे आणि गंजी या डोंगराच्या पाथ्याशी असतात. गंजीतील एका काडीने पेट घेतला तर संपूर्ण गंज पेटते. त्यामुळे जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर होतो. मात्र, आता त्याला पर्याय म्हणून मुरघास या नवीन पद्धतीत चाºयाची साठवणूक केली जाते. यात वणव्याचाही प्रश्न राहात नाही.
मुरघास म्हणजे मुरलेला चारा असतो. हा चारा हिरवा असतो. मुरघास बनविण्यासाठी मका, ज्वारी, बाजरी व काही गवती चारा पिके वापरली जातात. यामध्ये मका या पिकाचा सर्वात जास्त वापर जगभरात केला जातो. मुरघास तयार करण्यापूर्वी सकाळी शेतातून मका चार तासांपूर्वी तोडावा; पण तोडण्यापूर्वी मक्याची कणसे हुरड्यात असणे गरचेचे आहे. त्यामुळे तो मका तोडण्यास योग्य असतो. शेतातून मका आणून, कुटी मशीनवर दोन ब्लेडने कुटी करून घेणे आवश्यक असते.
तसेच मुरघास करण्यासाठी प्लास्टिकची हजार किलोची मोठी पिशवी तयार असणे गरजेचे आहे. त्यामध्ये मशीनवर कुटी केलेला मका त्या पिशवीत टाकावा. पिशवीत टाकताना प्रत्येक एक फुटावर मुरघास पावडर पसरावी. त्यामुळे त्याला कोणत्याही प्रक ारची कीड लागत नाही. पिशवीमध्ये कुटलेला मका टाकल्यावर प्रेस करून घड्ड बसवणे आवश्यक आहे. तसेच चारा पौष्टिक अवस्थेत असताना त्यातील अन्नघटकांचा नाश ना होऊ देता किमान ४५ दिवस हवा बंद करून ठेवावी. ही पिशवी भरल्यानंतर पॅक करून त्यावर चाळीस किलो वजन ठेवणे गरजेचे आहे.चारा पिके चिकाच्या किंवा फुलोºयाच्या अवस्थेत आली की कापावीत. पीक कापणीनंतर थोड्यावेळासाठी चारा सुकू द्यावा. त्यानंतर कुट्टी मशीनच्या साह्याने चाºयाचे एक-दोन इंच लांबीचे तुकडे करावेत. कुट्टी केल्यानंतर शक्यतो ती एका जागेवर साठवून न ठेवता त्वरित बॅगेत टाकावीत.
कुट्टी टाकल्यानंतर ती पसरून पायाने तुडवावी. त्यातील हवा बाहेर निघून जाते. कुट्टी दाबून घ्यावी.एकावर एक चाºयाचा थर टाकून व्यवस्थित दाबून शेवटचा थर देखील चांगला दाबून घ्यावा. त्यावर त्वरित प्लास्टिकचे आच्छादन घालावे. यामुळे हिरवा चारा हवाबंद होतो. त्यानंतर प्लास्टिक आच्छादनावर सहा इंच जाडीचा मातीचा थर द्यावा. त्यावर पावसाचे पाणी साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.एक चौरस फूट जागेत १५ ते १६ किलो चारा तयार होतो. गरज ओळखून खड्डे किंवा बांधकाम केले जावे.मुरघास बनविताना प्रत्येक थरावर काही जीवाणू असलेले द्रवण, मीठ फवारले जाते. त्यामुळे हिरवा चारा टिकून राहतो, मुरघास लवकर तयार होतो. बुरशीही लागत नाही.पहिल्या वेळी मुरघास बनविताना त्यात काहीही टाकू नये. प्रायोगिक तत्त्वावर मुरघास करून पाहावा, शिकून घ्यावे. शक्य असल्यास जीवाणूंचे द्र्रावण फवारावे, त्यामुळे खराब होण्याची शक्यता कमी होते.