येथील किसन वीर महाविद्यालयात आयोजित पदव्युत्तर विद्यार्थी व प्राध्यापक यांच्यासाठी कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंतराव चौधरी अध्यक्षस्थानी होते. संचालक सुरेश यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कौटगीमठ म्हणाले, दहावी, बारावीला ३६ व ३७ टक्के गुण मिळविणारा, स्मशानात अभ्यास करणारा माझ्यासारखा अतिसामान्य विद्यार्थी ३२ वेळा नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण होतो. मग करिअरची गरज असलेले विद्यार्थी उत्तीर्ण का होणार नाहीत, असा प्रश्नही त्यांनी केला. अभ्यास करा, मार्गदर्शन घ्या, ज्ञानासमोर नतमस्तक व्हा. तुमच्यातील चांगली गुणवत्ता ओळखणे म्हणजे शिक्षण आहे, असेही कौटगीमठ म्हणाले.
डॉ. जयवंतराव चौधरी म्हणाले, नेट सेट या गुणवत्तेची कसोटी पाहणाऱ्या या आजच्या गुणवत्तेची गरज बनल्या आहेत. या परीक्षांबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणारी कार्यशाळा विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी उपयुक्त आहे. कार्यशाळेत त्याबाबत सूक्ष्मपणे जाणून घ्या.
प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव म्हणाले, संकल्पना समजून घेऊन अभ्यास केल्यास यश कष्टसाध्य असते. अभ्यासाने विषयांत रुची वाढते. प्रा. डॉ. सुनील सावंत यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य विलास करडे, डॉ. रमेश वैद्य, प्रा. रवींद्र बकरे, प्रा. डॉ. राजेश गावित यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. धनंजय निंबाळकर यांनी परिचय करून दिला. प्रा. आरिफा शेख यांनी सूत्रसंचालन केले. तर उपप्राचार्य डॉ. भानुदास आगेडकर यांनी आभार मानले.
प्रा. डॉ. अरविंद जाधव, प्रा. नीलम भोसले, प्रा. डॉ. संजय सरगडे, प्रा. डॉ. राजशेखर बिलोली, प्रा. मारुती वाघ, प्रा. दीपाली पाटील यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
यावेळी एम.एस्सी.(प्राणिशास्त्र)परीक्षेत विद्यापीठात प्रथम आलेली विद्यार्थिनी सपना शिंदे हिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रा. पांडुरंग कांबळे, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते.
फोटो :- किसन वीर महाविद्यालयात आयोजित नेट-सेट विषयक कार्यशाळेत मार्गदर्शन करताना धानय्या कौटगीमठ, शेजारी डॉ. सुनील सावंत, प्राचार्य डॉ. एकनाथ भालेराव, डॉ. जयवंतराव चौधरी, डॉ. रमेश वैद्य, प्रा विलास करडे, डॉ. भानुदास आगेडकर, सुरेश यादव, प्रा. रवींद्र बकरे आदी.