शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

१३३ ग्रामपंचायतीपैकी ८४ ठिकाणी सरपंचपद सर्वसाधारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2021 9:06 AM

वडूज : खटाव तालुक्यातील १३३ गावांचे सरपंचपदाचे आरक्षण पंचायत समिती बचत सभागृहात जाहीर करण्यात आले. त्यापैकी १३ ...

वडूज : खटाव तालुक्यातील १३३ गावांचे सरपंचपदाचे आरक्षण पंचायत समिती बचत सभागृहात जाहीर करण्यात आले. त्यापैकी १३ ग्रामपंचायती लोकसंख्येच्या निकषांनुसार अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या. त्यामध्ये सात ठिकाणी स्त्रियांना तर सहा ठिकाणी पुरूषांना संधी मिळणार आहे.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे, गटविकास अधिकारी रमेश काळे, नायब तहसीलदार विलास जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख उपस्थित होते.

इतर मागासवर्गीय आरक्षण ३६ ठिकाणी झाले आहे. त्यामध्ये प्रत्येकी १८ महिला व पुरुषांना संधी मिळणार आहे तर ८४ ठिकाणी सरपंचपद सर्वसाधारण आहे. याठिकाणी किमान ४२ ठिकाणी महिलांना संधी मिळणार आहे. सर्वसाधारण खुला प्रवर्ग : नेर, एनकूळ, सिद्धेश्वर कुरोली, वांझोळी, तरसवाडी, गुंडेवाडी, मांजरवाडी, कामथी, मरडवाक, खातवळ, दरूज, पडळ, पारगाव, जायगाव, औंध, गोपूज, नांदोशी, कटगुण, शिरसवडी, डांभेवाडी, मायणी, पाचवड, अनफळे, मोराळे, नढवळ, अंभेरी, जाखणगाव, निमसोड, कणसेवाडी, शेनवडी, भूषणगड, चिंचणी, गणेशवाडी, गारूडी, मुसांडवाडी, गारळेवाडी, अनपटवाडी, फडतरवाडी (नेर),

गिरीजाशंकरवाडी, लांडेवाडी, पांढरवाडी, रणसिंगवाडी.

सर्वसाधारण महिलेसाठी होळीचागाव, पिंपरी, राजाचे कुर्ले, नागाचे कुमठे, हिंगणे, कलेढोण, वर्धनगड, गारवडी,

धकटवाडी, शिंदेवाडी, ढोकळवाडी, वडी, लाडेगाव,

सातेवाडी, कातरखटाव, येळीव, बोंबाळे, कान्हरवाडी, अंबवडे, हिवरवाडी, दातेवाडी, यलमरवाडी, पळसगाव,

भुरकवडी, उंबर्डे, फडतरवाडी (बुध), कारंडेवाडी, नवलेवाडी, नायकाचीवाडी, पांगरखेल, पुनवडी, रेवली, वाकळवाडी, पेडगाव, लोणी, दहिवड, कोकराळे, पोफळकरवाडी. गोरेगाव (निमसोड), सुर्याचीवाडी,

उंबरमळे, राजापूर.

नागरिकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी) वेटणे, रहाटणी,

खटाव, धोंडेवाडी, वाकेश्वर, येरळवाडी, गुरसाळे, जांब,

पुसेसावळी, धारपुडी, त्रिमली, गोसाव्याचीवाडी, नागनाथवाडी, रेवलकरवाडी, गादेवाडी, चोराडे,

खबालवाडी, तडवळे. नागरीकांचा मागासप्रवर्ग (ओबीसी महिला) बुध,

भोसरे, पळशी, दरजाई, खरशिंगे, भांडेवाडी, कातळगेवाडी, काटेवाडी, पवारवाडी, गोरेगाव वांगी, म्हासुर्णे, वडगाव (जस्वा), कळंबी, कानकात्रे, काळेवाडी,

निढळ, खातगुण, उंचीठाणे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी वरूड, पुसेगाव, डाळमोडी,

मोळ, चितळी, विखळे. अनुसूचित जाती महिला प्रवर्ग : विसापूर, मानेवाडी-तुपेवाडी, बनपूरी, मुळीकवाडी, ललगुण,

डिस्कळ, मांडवे.

चौकट :

सरपंचाची खुर्ची रिक्तच...

मांडवे, बनपुरी, कानकात्रे, मुळीकवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. मात्र कानकात्रे, मांडवे, बनपुरी येथे या प्रवर्गातील पुरुष उमेदवार निवडून आले आहेत तर मुळीकवाडीत या प्रवर्गाचा कोणीही उमेदवारच नाही. याठिकाणी दोन

सर्वसाधारण पुरूष, तीन सर्वसाधारण महिला व प्रत्येकी एक ओबीसी महिला व पुरुष आहे. त्यामुळे याठिकाणचे

सरपंचपद काही दिवस रिक्त राहण्याची शक्यता आहे.

चौकट :

सत्ता एकीकडे सरपंच विरोधकांकडे

निवडणूक झालेल्या ९० ग्रामपंचायतीपैकी काही

ग्रामपंचायतीत बहुमत एकाबाजूला तर सरपंचपदाचा

आरक्षित उमेदवार दुसऱ्या बाजूला अशी परिस्थिती

निर्माण झाली आहे. याचा मोठा फटका भाजप तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण यांच्या येरळवाडी तसेच राष्ट्रवादीचे युवा नेते सागर साळुंखे, माजी

उपसभापती संतोष साळुंखे यांच्या विसापूर गावामध्ये

बसला आहे.