आॅनलाईन लोकमत
कऱ्हाड (सातारा) , दि. 0१ : शेतकरी जगला तर देश वाचेलह्ण हा संदेश घेऊन शनिवारी कृषिदिनी कऱ्हाड येथे कऱ्हाड तालुका अॅमॅच्युअर अॅथलेटीक्स असोसिएशनच्या वतीने ह्यरन फॉर फार्मर्स मॅरथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. येथील दत्त चौकातून स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते झाले. देशातील शेतकऱ्यांसाठी पहिल्यांदा पार पडलेल्या या स्पर्धेस सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, वाशिम, पुणे, औरंगाबाद, माण, दहिवडी यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून सुमारे साडेतीन हजार स्पर्धक उपस्थित होते.यावेळी कऱ्हाड तालुका अॅमॅच्युअर अॅथलेटीक्स असोसिएशनचे अध्यक्ष भरत पाटील व उपाध्यक्ष अशोकराव थोरात, कऱ्हाड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाषराव एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, नगरसेवक विजय वाटेगावकर, प्रा. दीपक डांगे, दिलीप चिंचकर, अजिता पवार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आहे.यावेळी प्रायोजकांच्या हस्ते १८ वषार्खाली वयोगाटातील स्पर्धकांपासून ३० वर्षावरील वयोगटातील विजेत्या व सहभागी स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या स्पधेर्साठी विविध सामाजिक संघटना, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांमधील पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.