संतोष गुरव ।कºहाड : कºहाड शहर तसेच शहरातील प्रत्येक भागात आॅक्सिजनची निर्मिती व्हावी म्हणून पालिकेच्या वतीने गेलेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टच्या माध्यमातून ईदगाह मैदान परिसर तसेच ठिकठिकाणी गत सहा महिन्यांपासून पंच्याहत्तर एकर क्षेत्रात पाचशेहून अधिक आयुर्वेदिक व विविध जातींची रोपे लावली गेली आहेत. तसेच या ठिकाणी आॅक्सिजन झोनची निर्मिती केली जात आहे.
कºहाड पालिकेच्या वतीने शहर जास्तीत जास्त ग्रीन सिटी व्हावे म्हणून शहरात दुभाजक, सार्वजनिक ठिकाणी, उद्यान, नदीकाठ, स्मशानभूमी, शाळा, अंगणवाडी, पालिका इमारत, पाणी पुरवठा केंद्रे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी वृक्षप्रेमी संघटना व इतर सामाजिक संस्थांनीही पालिकेस सहकार्य केले आहे. सात ठिकाणी वृक्षारोपण करून पालिकेने शहरातील सुशोभीकरणात भरही टाकली आहे. पालिकेच्या या वृक्षारोपणाच्या कार्यासह सहकार्य व्हावे म्हणून आॅगस्ट २०१९ मध्ये ईदगाह मैदानाच्या सुमारे पंच्याहत्तर एकरातील मोकळ्या जागेत ठिकठिकाणी सुमारे सातशे रोपांची लागण करण्याचा निर्णय पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टींच्या वतीने घेतला गेला. त्यानुसार त्या ठिकाणी खड्डे खोदून त्यामध्ये पालिकेकडून दिलेल्या वृक्षांचे रोपणही करण्यात आले.
आज ती वृक्षे वाढू लागली असून, या वृक्षांना पालिका तसेच वृक्षप्रेमींकडून पाणी घातले जात आहे. जास्तीत जास्त आॅक्सिजन निर्मिती करणारी तसेच आयुर्वेदिक रोपांचे या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. यासाठी एनव्हायरो फे्रंडस नेचर क्लब या संस्थेनेही सहकार्य केले आहे. सुशोभीकरणासाठी जिथे मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी आकर्षक फुलझाडे पालिकेकडून लावली जात आहेत.वृक्षांच्या निगेसाठी आकर्षक कुंपणकºहाड पालिका व वृक्षपे्रमींकडून शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व्यवस्थित व्हावे म्हणून वृक्षांभोवताली आकर्षक कुंपण घातले जात आहे. तसेच नियमित पाणी देऊन काळजी घेतली जात आहे.सुशोभीकरणासाठी दुभाजकांतही वृक्षारोपणकºहाड शहर हे स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकांतही आकर्षक फुलझाडे लावण्यात आली आहेत. शहर सुशोभीकरणातील एक महत्त्वाचा घटक म्हणून दुभाजकांकडे पाहिले जाते. शहरातील कोल्हापूर नाका ते पोपटभाई पेट्रोलपंप, पोपटभाई पेट्रोल पंप चौक ते भेदा चौक, दत्त चौक ते विजयदिवस चौक, विजयदिवस चौक ते कृष्णा नाका या मार्गावरील दुभाजकांत वृक्षारोपण करण्यात आले आहे.सात ठिकाणी वृक्षारोपणकमळेश्वर मंदिरवैकूंठ स्मशानभूमीपेंढारकर पुतळा पाठीमागील परिसरप्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्निक परिसरउर्दू शाळेसमोरील परिसरमक्का-मस्जिदकल्याणी अॅकॅडमी परिसरकºहाड शहरातील ईदगाह मैदान परिसरात पालिका व ईदगाह मैदान ट्रस्टींच्या वतीने लावण्यात आलेली वृक्षांची पालिकेकडून निगा राखली जात आहे.