शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

सुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार, पोत सुधारण्यास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 5:04 PM

wai, farmar, sataranews वाईच्या पश्चिम भाग जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथे अनेक जातीवंत भाताच्या वाणापासून नवनवीन वाणांची लागवड केली जाते. भाताच्या खाचरातून पाटांच्या साहाय्याने सतत पाणी पुरवठा केला जातो. भाताचा पोत सुधारून सुवासिक तांदूळ व्हावा यासाठी शेतकरी भाताची काढणी करून खळ तयार करत आहेत. त्याभोवती बुचार (ऐरणी) रचून ठेवण्याचे परंपरा जुणी आहे. ती यंदाही जपली आहे

ठळक मुद्देसुवासिक तांदळासाठी लावले भाताचे बुचार पोत सुधारण्यास मदत : वाईच्या पश्चिम भागात शेतात खळी तयार

वाई : वाईच्या पश्चिम भाग जास्त पर्जन्यमानाचा असल्याने येथे अनेक जातीवंत भाताच्या वाणापासून नवनवीन वाणांची लागवड केली जाते. भाताच्या खाचरातून पाटांच्या साहाय्याने सतत पाणी पुरवठा केला जातो. भाताचा पोत सुधारून सुवासिक तांदूळ व्हावा यासाठी शेतकरी भाताची काढणी करून खळ तयार करत आहेत. त्याभोवती बुचार (ऐरणी) रचून ठेवण्याचे परंपरा जुणी आहे. ती यंदाही जपली आहे.वाई तालुक्याच्या पश्चिम भागात खरीपातील पेरणी क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र भाताचे असते. यामध्ये प्रामुख्याने रोप लागवड व पेरणीचे भात केले जाते. हवामान, मातीचे प्रकार यानुसार प्रत्येक भागामध्ये भाताच्या वेगवेगळया जातीची लागवड जवळपास निश्चित झालेली आहे. प्रामुख्याने भातामध्ये हळवागट, निमगरवा गट, बारवा गट, सुवासिक गट व बासमती प्रकरातील अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन जाती व संकरित जाती असे गट असतात.वाई तालुक्यात भातात सुवासिक गटातील इंद्रायणी, सुगंधा व इतर काही खासगी कंपनीच्या भाताच्या वाणाचा वापर होतो. इंद्रायणी वाणास भागात १४० ते १४५ दिवस लागतात. याबरोबरच धोम, अभेपुरी, गाढवेवाडी, पांडेवाडी, धावडी, पिराचीवाडी, वासोळे, वडवली, आसरे, मेणवली या गावात बासमती ३७०, रेठरे बासमती या वाणाचीही लागवड केली जाते.

कालावधी पूर्ण झालेली पिक हे कापणी करून विश्ष्टि पध्दतीने दिवाळीच्या आगोदर शेतामध्ये अथवा घराजवळ रचून ठेवला जातो. यामुळे शेतकऱ्यांना पुरेसा वेळ ही मिळतो. त्याचा शास्त्रीय फायदा असा होतो की भात पेंढ्यातील संपूर्ण कस किंवा अर्क हा भाताच्या तांदळामध्ये उतरतो. यामुळे तांदळाला विशिष्ट चव येते. त्यामुळे या भागातील तांदळाला बाजारपेठेत मागणी असते.

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसरwai-acवाई