शहरं
Join us  
Trending Stories
1
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
2
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
3
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
4
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
5
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
6
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
7
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
8
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
9
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
10
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
11
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
13
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
14
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
15
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
16
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
17
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
18
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
19
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
20
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी

पहाडी तस्कर सापाची राष्ट्रीय पातळीवर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 2:48 PM

खंडाळा येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनने अतिदुर्मिळ असलेल्या ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ सापावरील केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा प्रबंध चेन्नई येथील कोब्रा शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला असल्याने ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले आहे .

ठळक मुद्देमहाबळेश्वर येथील एका घराच्या परिसरात आढळला आगळ्या-वेगळ्या प्रकारचा सापअतिदुर्मिळ अन् बिनविषारी या सापाची नोंद इंडियन हरपेटोलॉजिकल सोसायटीकडे ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान

खंडाळा : येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनने अतिदुर्मिळ असलेल्या ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ सापावरील केलेल्या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा प्रबंध चेन्नई येथील कोब्रा शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला असल्याने ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले आहे .

महाबळेश्वर येथील एका घराच्या परिसरात आगळ्या-वेगळ्या प्रकारचा साप आढळून आला होता. घरमालकाने सर्पमित्र अक्षय गायकवाड व प्रदीप सोनवणे यांच्याशी संपर्क साधून त्यांना या सापाची माहिती दिली. यानंतर सर्पमित्रांनी महाबळेश्वर येथे येऊन हा साप पकडला. 

पकडलेल्या सापाचा वेगळेपणा लक्षात आल्याने सर्पमित्रांनी खंडाळा येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनचे रवि पवार व राहुल तायडे यांना बोलावून त्यांना या सापाची पाहणी करण्यास सांगितले.

पाहणीनंतर हा साप अतिदुर्मिळ ‘अल्बिनो पहाडी तस्कर’ प्रजातीचा असल्याची माहिती समोर आली.  वन विभागाकडे नोंदणी, मोजमाप व इतर पाहणी करून सापाला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले.

हा साप बिनविषारी असला तरी अतिदुर्मिळ असल्याने या सापाची नोंद इंडियन हरपेटोलॉजिकल सोसायटीकडे करण्यात आली. याबाबत तयार केलेला प्रबंध चेन्नई येथील कोब्रा शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध केला असल्याने ग्रामीण भागातील संशोधनाला राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळाले आहे.अतिदुर्मिळ अन् बिनविषारी

हा साप अल्बिनो पहाडी तस्कर प्रजातीमधील अतिदुर्मिळ अन् बिनविषारी असून त्याच्या मानेवर उभे काळे पट्टे असतात. उर्ध्व शरीर गडद तपकिरी रंगाचे असून त्यावर तोरडी पैंजण सारखी नक्षी असते. पैंजणीत पांढºया रंगाचे ठिपके असतात. शरिराचा मध्यभाग धूसर असतो. हे साप विजेच्या चपळाईने हल्ला करतात. अशी माहिती वाईल्ड लाईफ रेस्क्यू असोसिएशनचे रवि पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.