जिजाऊ संस्थेचे संस्थापक समीर नदाफ व शांताई फाउंडेशनच्या संस्थापिका अश्विनी वेताळ यांच्याकडे बाबा पवार यांनी मदत सुपुर्द केली. यावेळी वंदना पवार, प्रणित पवार, प्रतीक पवार, श्रीकांत पाटील, प्रकाश महिपाल, सलमा नदाफ, स्वयंसेवक जयवंत मोरे, दीपक दोडके, माधुरी टोणपे, श्रेया वेताळ, सचिन काेळी आदी उपस्थित होते.
चाैकट
चित्रकलेच्या माध्यमातून जनजागृती
प्रयोगशील व उपक्रमशील शिक्षक अशी त्यांची ओळख आहे. चित्रकला, जादूचे प्रयोग, कवितेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जनजागृती केली आहे. समाजाचे वास्तव दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या शुभेच्छा पत्रांची दखल घेऊन महाराष्ट्र बुक ऑफ रेकाॅर्ड व एशिया बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे.
कोट :
चित्रकला मनाला निखळ आनंद देणारे माध्यम आहे. या कलेच्या माध्यमातून समाजाची सेवा घडावी, ही आपली धारणा आहे. समाजातील वंचित, निराधार घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे. या कार्यात हातभार लावता आला, याचे वेगळे समाधान निश्चितच आहे.
- बाबा पवार, ज्येष्ठ चित्रकार
फोटो
सामाजिक संस्थांना धनादेश प्रदान करताना चित्रकार बाबा पवार.