रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली. महाराष्ट्र पाणीदार करण्याचे तुमचे-आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळूकरांची शेवटपर्यंत साथ हवी आहे,’ असे भावनिक आवाहन अभिनेते अमीर खान यांनी केले.कोरेगाव तालुक्यातील वेळू येथे वडजाई देवी मंदिरात पाणी फाउंडेशन आयोजित परिसंवादात अमीर खान यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी डॉ. अविनाश पोळ, स्वाती भटकळ, सरपंच लक्ष्मीबाई भोसले, सतीश भोसले, माजी सरपंच लहुराज भोसले, सुखदेव भोसले, शरद भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.अमीर खान पुढे म्हणाले, ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा सुरू केली तेव्हा या स्पर्धेमध्ये लोक सहभागी होतील का ? आम्ही जे सांगतोय ते योग्य आहे का ? ग्रामस्थ यामध्ये काम करतील का ? असे अनेक प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झाले होते. या स्पर्धेत वेळू गाव सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकदीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी दिली. तुम्हीच वेळ दिला, मेहनत घेतली. त्यामुळे वेळू गावाचा पाणी प्रश्न सुटला, ही फार मोठी गोष्ट आहे. या गावाकडे बघून इतर गावांना प्रेरणा मिळते. त्यामुळे तुम्ही इतर गावांना या कामाबाबत माहिती द्या.’दरम्यान, प्रास्ताविकांमध्ये दुर्योधन ननावरे यांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये गाव सहभागी झाल्याने दोनच वर्षांत गावाचा कायापालट झाला आहे. तसेच गाव टँकरमुक्त झाले आहे, असे सांगितले.त्यावेळी मी थोडासा घाबरलो होतो : खान‘डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण वेळू गावामधील एका हातपंपावर झाले. हातपंपाला एकच हात मारणार, जर पाणी नाही आले तर मी अॅक्टिंग सोडणार, असा माझा डायलॉग होता. त्यावेळी मी थोडा घाबरलो होतो. जर पाणी नाही आले तर... माझ्या अॅक्टिंगच काय ? असा प्रश्न पडला. परंतु वेळूमध्ये चांगलं काम झाल्यामुळे पाणी निश्चितपणे येणार, असा विश्वास होता. त्यामुळेच मी एक हात मारला अन् हातपंपातून पाणी बाहेर आले,’ अशी माहिती अमीर खान यांनी परिसंवादादरम्यान ग्रामस्थांना दिली.घास उगाना है....पेड लगाना है !पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वेळू गाव पाणीदार झाले आहे. आणखी पाणलोटचे काम करायचे आहे. मात्र, याबरोबरच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून मातीचा कस वाढवायचा आहे. या मातीमध्येच पाण्याच्या उपलब्धतेनुसार घास उगाना है, पेड लगाना है ! ही सर्व कामे केल्यानंतर गाव एका वेगळ्याच उंचीवर जाऊन पोहोचणार असल्याचे अमीर खान यांनी सांगितले.कोरेगाव तालुक्यातील वेळूतील याच हातपंपावर अमीर खान यांच्या डॉक्युमेंट्रीचे चित्रीकरण झाले. यावेळी अमीर खान यांनी एकदाच पंप मारताच पाणी आले.
पंपाला हात मारणार; पाणी नाही तर अॅक्टिंग सोडणार अमीर खानचा डॉयलॉग यशस्वी: वेळू ग्रामस्थांशी साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:33 AM
रहिमतपूर : ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या सुरुवातीला या स्पर्धेत वेळू ग्रामस्थ सहभागी झाले. ग्रामस्थांनी ताकतीने काम करून आमच्या विश्वासाला बळकटी निर्माण करून दिली.
ठळक मुद्देवॉटर कप स्पर्धेची जिल्ह्यात जोरदार तयारी, अमीर खानचा डॉयलॉग यशस्वी