सातारा : पंढरीच्या विटेवरील पांडुरंगाला डोळे भरून पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरला दिंडीतून जातात. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील असंख्य वारकरी तसेच सातारा जिल्ह्यातील नागरिक आषाढीच्या आदल्यादिवशी एसटीने पंढरपूरला जातात. त्यामुळे एसटीला लाखो रुपयांची मदत होत असते. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने राज्य शासनाने एकादशीला पंढरपुरात वारकऱ्यांना जाण्यास परवानगी नाकारली आहे.
कोट :
दरवर्षी आषाढी एकादशीच्या आदल्यादिवशी तसेच नंतरचे काही दिवस एसटीतून लाखो वारकरी प्रवास करतात. कितीही फेऱ्या वाढविल्या, तरी एसटीत पाय ठेवायलाही जागा मिळत नाही.
- सदाशिव घोलप,
चालक, एसटी महामंडळ.
चौकट :
पालखी यंदाही एसटीनेच गेली
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पाच दिवस सातारा जिल्ह्यात मुक्कामी असतो. कोरोनाचा धोका असल्याने गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोमवारी दुपारी बाराच्यासुमारास फुलांनी सजविलेल्या एसटीतून माऊलींची पालखी पंढरपूरला गेली.
चौकट
ज्ञानेश्वर माउलींसोबत असंख्य दिंड्या
सातारा जिल्ह्यातून दरवर्षी शेकडो लहान-मोठ्या दिंड्या पंढरपूरला जात असतात. त्याचप्रमाणे सर्वात मानाची म्हणजे आळंदीहून पंढरपूरला जाणारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद, तरडगाव, फलटण, बरडमार्गे सोलापूर जिल्ह्यात जात असते.
संतांच्या दिंड्यांसोबत काही सामाजिक संदेश देणाऱ्या दिंड्याही यात सहभागी होत असतात. यामध्ये मेढा येथील विलासबाबा जवळ यांची व्यसनमुक्ती दिंडी, काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची व्यसनमुक्ती दिंडी यामध्ये सहभागी होत असतात.
वारकऱ्यांचेही गावी मन रमेना
पंढरपूरची वारी आयुष्यात कधीही चुकविली नाही. कितीही अडचणी आल्या तरी, ती पूर्ण केली. पण दोन वर्षांपासून जाता येत नाही. चुकल्या चुकल्यासारखे सतत वाटत असते.
- सूर्यकांत माने, वारकरी.
कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी आषाढी करता आली नाही. खूप इच्छा आहे. एसटीने पंढरपूर जायचा विचार येतोय; पण पंढरपुरात येऊ दिले जाणार नाही. पण पुढच्यावर्षी तरी हे संकट दूर व्हायला हवे.
- संजय काळे,
वारकरी.
या टेम्प्लेटसाठी आपल्याकडील फोटो वापरणे...
१८वारी