शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीत प्रवेश करताच झिशान सिद्दिकी यांना तिकीट, अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर
2
आदित्य ठाकरेंच्या वरळीत राज ठाकरेंनी घातलं लक्ष; संदीप देशपांडेंना खास 'मेसेज'
3
जागावाटपाचा संघर्ष मुख्यमंत्रिपदासाठी! निकालानंतर महत्त्वाच्या भूमिकेसाठी मित्रांशी संघर्ष
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार
5
JioHotstar डोमेन खरेदी करून पठ्ठ्याने मागितले १ कोटी, आता Reliance नं काय केलं? काय आहे संपूर्ण प्रकरण?
6
“मला पाहताच राज ठाकरेंना अश्रू अनावर झाले होते”; मयुरेश वांजेळेंनी सांगितली भावूक आठवण
7
कधी अन् कुठं पाहता येईल IND-A vs AFG-A Semi-Final 2 ची लढत? जाणून घ्या सविस्तर
8
बारामतीत युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी, तर दादा...; अजित पवार गटानं डिवचलं
9
झिशान सिद्दीकींना राष्ट्रवादीकडून उमेदवारी; नवाब मलिकांना संधी नाही? अजित पवार म्हणाले...
10
सहा मतांनी आमदार... १००च्या आतील मतफरकाने आजवर १२ जणांनी जिंकली विधानसभा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत
12
Share Market Opening : आधी किरकोळ तेजी, मग घसरण; मोठ्या घसरणीसह उघडले 'हे' शेअर्स
13
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
14
शनी मार्गी: ७ राशींची दिवाळीनंतरही दिवाळी, व्यवसायात नफा; उधारी वसूल होईल, बँक बॅलन्स वाढेल!
15
पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम
16
सरकारी निर्णयांवर आयोगाचा असेल ‘वॉच’; मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती
17
विकास हवा, नको नुसता बोभाटा; नाही तर आहेच ‘नोटा’; गेल्यावेळी हा पर्याय होता दुसऱ्या स्थानी
18
फक्त विक्री आणि विक्री... शेअर बाजाराला कोणाची नजर लागली; कोरोनानंतर मोठी निराशा, काय आहे इशारा?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पाच वर्षांत आदित्य ठाकरेंच्या संपत्तीत ४ कोटींची वाढ
20
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड

"पंकजा मुंडेंचा भविष्यकाळ उज्ज्वल"; उदयनराजेंनी भेट दिली तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 6:27 PM

उदयनराजे यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी, उदयराजेंनी पंकजा मुडेंना तलवार भेट दिली. 

सातारा -  भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आणि त्याला मिळणारा प्रतिसाद सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत आहे. त्यातच, पंकजांची यात्रा आज खासदार उदयनराजेंच्या सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आली. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात होता. या दौऱ्यात शिखर शिंगणापूर येथे उदयनराजे यांची त्यांनी भेट घेतली. त्यावेळी, उदयराजेंनी पंकजा मुडेंना तलवार भेट दिली. 

पंकजा मुंडे यांची राज्यात शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू असून आज फलटण शहरामध्ये यात्रेचे आगमन होताच क्रांतिसिंह नाना पाटील चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. पंकजा मुंडे यांचा ताफा थांबतात कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीभोवती गर्दी केली. येथील दौऱ्यानंतर पंकजा यांनी शिखर शिंगणापूर येथे जाऊन शिवलिंगांची पूजा केली. यावेळी, स्वत: उदयनराजे भोसले त्यांच्यासमवेत पुजेला बसले होते. तत्पूर्वी पंकजा यांचे स्वागत करताना उदयनराजेंनी तलवार भेट देत पंकजांचं कौतुक केलं.  पंकजा यांनी स्वतःसह समाजाचं रक्षण करावं म्हणून मी त्यांना तलवार भेट दिली आहे. मी जेव्हा पंकजा मुंडे यांना पाहतो, त्यांची भाषणं ऐकतो, त्यांची भाषणशैली पाहून असं वाटतं की गोपीनाथ मुंडे भाषण करत आहेत. त्यांनी जी यात्रा हाती घेतली आहे, त्याची नितांत आवश्यकता होती. आपण चांगलं करतो त्याला कर्म म्हणतात आणि या कर्मामुळेच पंकजा मुंडेंचा भविष्यकाळ उज्वल आहे, असे म्हणत उदयनराजेंनी पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेचं जोरदार स्वागत केलं. 

दरम्यान, पंकजा मुंडेंनीही उदयनराजेंसमवतेच फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यासोबतच, आमचे बंधु म्हणत उदयनराजेंच्या भेटीचा उल्लेख केला.  

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले