शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
3
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
4
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
5
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
6
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
7
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
8
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
9
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
10
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
11
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
12
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
13
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
14
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
15
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
16
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
17
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
18
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
19
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
20
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त

पालकत्व नाकारले.. अन्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:46 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज त्यांना जीव गमवावा लागत आहे. जर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा पालिकेने शहरातील भटक्या श्वानांचे पालकत्व नाकारल्यानेच आज त्यांना जीव गमवावा लागत आहे. जर दोन-चार वर्षांपूर्वी पालिकेने निर्बीजीकरणाची मोहीम सक्षमपणे राबविली असती तर श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आले असते, तसेच अज्ञातांना त्यांच्यावर विषप्रयोग करण्याची वेळही आली नसती, असे मत प्राणितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यासह सातारा शहरात भटक्या श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, आज ती हजारोंच्या घरात पोहोचली आहे. या श्वानांकडून नागरिकांवर हल्ले करण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. शहरात एकीकडे श्वानांचा उपद्रव सुरू असताना दुसरीकडे चार भटक्या श्वानांचा नुकताच आकस्मित मृत्यू झाल्याने हा विषय पुन्हा एकदा चर्चेचा ठरला आहे. वाढती संख्या व उपद्रवामुळेच या श्वानांवर कोणीतरी विषप्रयोग केला असावा, असे सांगितले जात आहे. असे असले तरी पालिकेने भटक्या श्वानांचा विषय आजवर कधीच गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळेच मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत असल्याचे प्राणितज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पालिका प्रशासनाने २०१६ मध्ये श्वानांना पकडण्यासाठी डॉग व्हॅनचा विषय मंजूर केला होता. मात्र, हा विषय आजअखेर केवळ कागदावरच आहे. यानंतर चार वर्षांपूर्वी श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली. एका संस्थेशी करार करून पालिकेने शहरात राबविलेली ही मोहीम अर्ध्यावरच थंडावली. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या अन् त्यांची दहशत कमी होण्याऐवजी ती वाढू लागली आहे.

(चौकट)

चार वर्षांनंतर निर्बीजीकरण मोहीम !

सातारा शहरात श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असून, नागरिकांमधून भटक्या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी सातत्याने केली जात आहे. याची दखल घेत पालिकेने चार वर्षांनंतर भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, एका खासगी संस्थेमार्फत ही मोहीम राबविली जाणार आहे.

(चौकट)

श्वानांनी जिल्ह्यात इतक्या

जणांना घेतला चावा

२०१७ १६,१३१

२०१८ २१,०६८

२०१९ २६,३९२

२०२० २६,२५७

२०२१ ११६०

(चौकट)

यामुळे पिसाळताहेत श्वान

- संचारबंदीत हॉटेल, हातगाडे, दुकाने बंद होती.

- त्यामुळे श्वानांना सहज मिळणारे अन्न बंद झाले.

- लोकांनी त्यांना खाऊ-पिऊ घालणेही बंद केले.

- मिळेल त्या अन्नासाठी श्वानांमध्ये किळवंड सुरू झाली.

- त्यामुळे श्वान आक्रमक झाले व पिसाळण्याचे प्रमाण वाढले.

- वाहनधारक व पादचाऱ्यांच्या अंगावरही ते धावून जाऊ लागले.

(कोट)

वर्षभरात श्वानाची एक मादी दहा पिलांना जन्म देते. यातील सात-आठ पिले आजाराने व अपघाती मृत्युमुखी पडतात. श्वानांची संख्या रोखण्यासाठी पालिकेने उशिरा का होईना निर्बीजीकरण मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम केवळ कागदावर न राहता ती प्रभावीपणे राबवायला हवी.

- सायली त्रिंबके, साया अ‍ॅनिमल केअर, सातारा