शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

महामार्गाच्या नाल्यात आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; वनवासमाचीतील घटना

By संजय पाटील | Published: September 29, 2023 12:46 PM

पुरूष जातीचा मृतदेह असून नेमके काय घडले असावे? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

कऱ्हाड : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाकडेला वनवासमाची, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. महामार्गालगत असलेल्या नाल्यात मृतदेह पडलेला असल्याने घातपात झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे. पुरूष जातीचा मृतदेह असून नेमके काय घडले असावे? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची परिसरात महामार्ग व सेवारस्त्यामधे असलेल्या नाल्यात शुक्रवारी मृतदेह  पडलेला होता. पुरूष जातीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने तो जाळण्याचा प्रयत्न झाला असावा. मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडल्याचे पहाटे व्यायामासाठी आलेल्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. हा प्रकार समजताच तळबीडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल वरूटे यांच्यासह पोलीस घटनास्थळी गेले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सुत्रे वेगाने हलवली. 

हा घातपात आहे की अन्य काही प्रकार, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी तीन पथके तयार केली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम दुपारपर्यंत सुरू होते. मृतदेह स्थानिक कोणाचा आहे की बाहेरून आणत फेकून दिला आहे? हा घातपात आहे की अन्य काही? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर