कऱ्हाड : येथील टिळक हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस व आंतरराष्ट्रीय संगीत दिवस ऑनलाईन पध्दतीने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. योग प्रात्यक्षिकांमध्ये शेकडो विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला.
आंतरराष्ट्रीय योग दिन न संगीत दिनाची सुरूवात राष्ट्रगीत, शालेय प्रार्थना व योग प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी ‘योगसाधना’ या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मुख्याध्यापक जी. जी. अहिरे, उपमुख्याध्यापक के. पी. वाघमारे, पर्यवेक्षक एस. एस. शिंदे व एस. यु. बाबर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विभागप्रमुख भरत कदम, जीवन थोरात, कार्याध्यक्ष गोविंद पवार, उपकार्याध्यक्ष प्रकाश मोरे, संगीत विभागप्रमुख संगीता काणे, संगीत शिक्षक मकरंद किर्लोस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय योग दिन व संगीत दिनाचे महत्त्व मुख्याध्यापक जी. जी. अहिरे यांनी सांगितले. उत्तम आरोग्यासाठी योगसाधना व प्राणायामाचे महत्त्व भरत कदम यांनी सांगितले. जीवन थोरात व गोविंद पवार यांनी योग प्रात्यक्षिक सादर केले.
व्ही. बी. बोधे, एस. एस. कुलकर्णी, ए. एस. मोरे, पी. एस. मोरे या तंत्रस्नेही शिक्षकांनी पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन योग सादरीकरणासाठी विशेष परिश्रम घेतले. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले तर जी. एम. पवार यांनी आभार मानले.