लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त शाहुपुरी येथील आयोजित रक्तदान शिबिरास उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये अनेक सुपर रक्तदात्यांनी सहभाग घेतला. काहींनी ३० ते ४० वेळा रक्तदान केले आहे. लोकमतच्या रक्तदान शिबिरात त्यांनी आणखी एकदा रक्तदान करुन आपल्या रक्तदानाच्या चळवळीत भरच घातली आहे. शाहुपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनीही युवकांनी रक्तदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे असे सांगत रक्तदानाचे आवाहन केले.
शाहुपुरी येथे फूड अँण्ड ड्रग कन्झुमर वेलफेअर कमिटी, ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था आणि लोकमतच्यावतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी धनंजय धनवडे, योगेश सुतार, महेश बैले या सुपर रक्तदात्यांनी रक्तदान दिले.
शाहुपूरी येथील रक्तदान शिबिरात फूड अँण्ड ड्रग कन्झुमर वेलफेअर कमिटीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अनुराधा गोलिपकर, सातारा जिल्हा अध्यक्ष कृष्णात सावंत, उपाध्यक्ष सतीश इंदलकर, लोकमतचे अकाैंट प्रमुख विश्वजीत गुजर, अनुप चौरासिया, अली मुजावर, दीपक यादव यांनी महत्वाची भूमिका बजावली.
या शिबिरात धनंजय धनवडे यांनी ३० पेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे. योगेश सुतार यांनी ३५ वेळा तर महेश बैले यांनी ३८ वेळा रक्तदान केले. त्याबरोबरच निलेश जावळे, धीरज जाधव आणि अनिल कोरे या लोकमतच्या सहकाऱ्यांनीही रक्तदान केले.
फोटो
शाहुपुरी येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेत आयोजित रक्तदान शिबिरावेळी शाहुपुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, सखी मंच सदस्या पल्लवी मोरे, अनुराधा गोलिपकर, अर्चना जाधव, प्रिया अदाटे, गौरी गुरव, अंजुम पठाण, स्वाती नामदार आदी.