उंब्रज : उंब्रज एस. टी. बसस्थानकात येण्यासाठी उंब्रज ग्रामपंचायत, उंब्रज पोलीस ठाणे ‘लोकमत’च्या वतीने मोहीम राबविण्यात आली. यासाठी उपमार्गालगतची अतिक्रमणे काढून पूर्ण रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. तरीही एसटीच्या चालक, वाहकांच्या आडमुठ्या धोरणामुळे प्रवाशांची ससेहोलपट सुरू झाली आहे.येथून कऱ्हाड व सातारा येथे रोज प्रवास करणारे शेकडो नोकरदार वर्ग आहे, तर हजारो विद्यार्थी आहेत. एसटी बसस्थानकात येण्यासाठी उंब्रजकरांनी सर्व मदतही महामंडळाला केली आहे; परंतु महामार्गावरून एसटी उपमार्गाने बसस्थानकात नेण्यासाठी चालकाना कसली अडचण आहे. हेच समजून येत नाही.सातारा, कऱ्हाड येथे एसटीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना एसटीतून खाली उतरण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. यामुळे येथे विद्यार्थी व पालकांच्यात असंतोष निर्माण होऊ लागला आहे.याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेने सातारा येथे विभाग नियंत्रकाना लेखी निवेदनही दिले आहे. या निवेदनानुसार एसटी महामंडळ विद्यार्थीकडून पासची पूर्ण रक्कम आगावू भरून घेते. तरीही एसटीमध्ये विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्याच्याकडून जबरदस्तीने तिकीट घेण्यात येत आहेत. तसेच उंब्रज-राजवाडा, उंब्रज कऱ्हाड या शटल बससेवा सुरू कराव्यात; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, उपाजिल्हाध्यक्ष अमोल तांबे, तालुकाध्यक्ष रणजित कदम यांच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)कारवाईची मागणीसोमवार, दि. १५ डिसेंबर रोजी दुपारी येथील सुनीता जाधव या विद्यार्थिनीला ज्योतिबा-कोरेगाव या एसटीत वाहकाने अर्वाच्च शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक दिली. वाहतूक नियंत्रकाने पास चालतो; असे सांगूनही शालेय साहित्य खाली फेकून दिली. याबाबत तिने उंब्रज पोलिसात तक्रार दिली आहे. तर तिच्या पालकांनी मनसे पदाधिकाऱ्यासह महामंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित वाहक व चालक यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रस्ता मोकळा तरी प्रवाशांची ससेहोलपट
By admin | Published: December 17, 2014 9:22 PM