सातारा : पासपोर्ट अर्थात पारपत्र म्हणजे आपल्या देशातून बाहेर देशात जाण्यासाठी सरकारकडून मिळालेली रितसर परवानगी. ही परवानगी काही अटींवर मिळते. मात्र, पासपोर्ट कार्यालय पुणे येथे असल्यामुळे सातारकरांना पासपोर्टसाठी सतत हेलपाटे मारावे लागतात. सातारकरांचा वेळ आणि पैशाची बचत व्हावी यासाठी ‘उदयनराजे मित्र समूहा’च्या वतीने शनिवार, दि. १२ व रविवार, दि. १३ डिसेंबर या कालवधीत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पासपोर्ट कॅम्पचे आयोजन केले आहे. पूर्वी पासपोर्ट कार्यालय सातारा येथे होते. मात्र, हे कार्यालय पुणे येथे सुरू झाल्याने सातारकरांना पासपोर्टसाठी लागणारी कागदपत्रे जुळविताना व त्यांची पूर्तता करताना मोठी धावपळ करावी लागत आहे. पासपोर्टला येणाऱ्या खर्चापेक्षा अधिक पैसे हे पुणे-सातारा हेलपाटे मारण्यातच खर्च करावे, लागत आहे. तसेच साताऱ्यात माहिती केंद्राचा अभाव असल्यामुळे अनेकांनी या त्रासापासून सुटका करून घेण्यासाठी पासपोर्टचा नाद सोडला आहे. तर अनेक नागरिक अधिक पैसे मोजून एजंटामार्फत हे काम करून घेत आहेत. साताराकरांची ही परवड थांबविण्यासाठी येथील उदयनराजे भोसले मित्र समूहा च्या वतीने दि. १२ व १३ डिसेंबर रोजी साताऱ्यात ‘पासपोर्ट कॅम्प’चे आयोजन केले आहे. पासपोर्ट काढण्यसाठी पुण्यातील यंत्रणा पहिल्यांदा साताऱ्यात येत आहे. हा कॅम्प जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, नावनोंदणीसाठी दि. ९ पासून ६६६.स्रं२२स्रङ्म१३्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर फॉर्म व शुल्क भरने आवश्यक आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रथमच दोन दिवसीय पासपोर्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. पासोर्टसाठी होणारी नागरिकांची परवड थांबावी, त्यांचा वेळ व पैसा वाचावा हाच या मागचा उद्देश आहे. सातारकर या संधीचा नक्कीच लाभ घेतील, अशी आशा आहे. - संग्राम बर्गे, सामाजिक कार्यकर्ता