शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

पर्याय पाटीला... आराम पाठीला!

By admin | Published: June 29, 2015 10:48 PM

अभिनव कल्पना : माण तालुक्यातील घुणेवस्ती शाळेतील विद्यार्थी करतायत फरशीचा पाटीसारखा उपयोग

सातारा : कोवळ्या जिवांवरील दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी ‘लोकमत’ने जागृती मोहीम छेडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यातील अनेक शाळांनी ही गोष्ट गांभीर्याने घेत वेगवेगळे बदल केले. माण तालुक्यातील घुणेवस्ती-पानवण येथील मराठी शाळेने तर एक अभिनव कल्पना सत्यात उतरविली आहे. शाळेतील फरशीलाच काळा रंग देऊन विद्यार्थी फरशीचा पाटीसारखा वापर करत आहेत. मुलं ‘अआई’पासून ते गणिताची आकडेमोडही या पाटीवर करत आहेत.माण तालुक्यातील पानवणशेजारी घुणेवस्ती येथे पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. ग्रामीण भागातील ही शाळा वाड्यावस्त्यांवरील मुलांसाठी जणू एक आनंददायी शिक्षणाचं केंद्र बनली आहे. येथील शिक्षक नेहमी आगळेवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे ही एक गंभीर समस्या असून या शाळेने इतरांपेक्षा हटके उपाय शोधून त्याची अंमलबजावणीही केली आहे.शाळेचे शिक्षक शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, पानवण गावाशेजारील ही शाळा अतिशय ग्रामीण भागात आहे. ऊसतोड मजुरांची मुले या शाळेत शिकतात. त्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी मुख्याध्यापक कल्याण भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. मुलांना शिक्षणाचं ओझं न वाटता हसत-खेळत शिकता यावं यासाठी शाळेचं संपूर्ण रुपडं बदलून टाकलं आहे. शाळेतील वातावरण नेहमी आनंदी आणि तणावमुक्त राहावं, यासाठी शाळेच्या भिंतीवर निसर्गचित्रे काढण्यात आली आहेत. झाडे-वेली, फुले, पक्षी, बागडणारी मुलं अशा चित्रांमुळे शाळेच्या भिंती जणू बोलक्या झाल्या आहेत. फक्त भिंतीच नव्हे तर शाळेच्या ओट्यावरही निसर्गचित्र रेखाटली आहेत. त्यामुळे मुलं उत्साहानं शिक्षण घेत आहेत. (लोकमत चमू)आमची शाळा ही ग्रामीण भागात आहे. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, यासाठी शाळेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. दप्तराचं ओझं कमी व्हावं, यासाठी शाळेतील फरशीचा पाटीसारखा वापर केला जात आहे. दप्तर शाळेत ठेवता यावे, यासाठी प्रत्येकासाठी रॅकची सोय केली आहे. - कल्याण भागवत, मुख्याध्यापक, प्राथमिक शाळा, घुणेवस्ती-पानवणसर्व विद्यार्थी संगणक साक्षरघुणेवस्ती शाळा ही ग्रामीण भागातील शाळा आहे. ग्रामीण भाग असला तरी येथील लोकांना शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे. मुलांना आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून लोकसहभागातून शाळेला संगणक, लॅपटॉप देण्यात आला आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने संगणक हाताळता येतो. लोकसहभागामुळे शाळेची प्रगतीघुणेवस्तीवरील लोक शाळेच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असतात. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी ते आग्रही आहेत. शाळेचा शिक्षकवर्ग आनंददायी शिक्षणासाठी नेहमतीच प्रयत्नशील असतो. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व ग्रामस्थांना शाळेत निमंत्रित केले जाते. गुढी उभारून आणि मिष्ठान्न देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते.दप्तर ठेवण्यासाठी रॅकची सुविधाशाळेने मुलांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी व्हावं, यासाठी शाळेत प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र रॅकची सुविधा दिली आहे. विद्यार्थी आपले दप्तर त्यांच्या रॅकमध्ये ठेवतात. अभ्यासापुरत्या वह्या, पुस्तके दप्तरात राहत असल्यामुळे ओझे कमी झाले आहे.