पाटण : ‘निवडून दिले ते शिवसेनेचे की भाजपचे आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपद मागण्याऐवजी भाजपच्या मुख्यमंत्र्यांकडे मंत्रिपदाची मागणी करतात. राजकारणात तारतम्य हवे काय मागायचे? कोणाला मागायचे? हे कळत नाही, अशा लोकांचे काहीच होत नाही. जे नेत्यांशी प्रामाणिक नाहीत ते सर्वसामान्य जनतेशी कसे काय प्राणाणिक राहतील? अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर नाव न घेता केली.
पाटण येथील नगरपंचायत मैदानावर सोमवारी झालेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, आमदार नरेंद्र पाटील, आमदार जयदेव गायकवाड, चित्रा वाघ, सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘गोरगरिबांना अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या शासनाने गरिबांच्या पेटत्या चुली विझविण्याचे काम केले आहे, अशा फसव्या सरकारला उलथवून टाकण्यासाठी हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यामातून जनता एकवटली आहे.
धनजंय मुंडे म्हणाले, ‘ललित मोदी, विजय मल्ल्या, निरव मोदी हजारो कोटी रुपये घेऊन देशाबाहेर पळाले. रोज नवीन नवीन आर्थिक घोटाळे बाहेर पडत आहेत. या शासनातील सोळा मंत्र्यांनी नव्वद हजार कोटींचा भ्रष्टाचाराबाबत पुरावे सभागृहात सादर केले.’
यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘सर्वसामान्य जनता भरडली जात असून, शेतकरी दयनीय अवस्थेत आत्महत्येचा मार्ग शोधत आहे.’ यावेळी सत्यजितसिंह पाटणकर यांनीही भाषण केले.ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर, संग्राम कोलते-पाटील, तेजस शिंदे समिंद्र्रा जाधव, राजेश पवार, बापूराव जााधव, उज्ज्वला जाधव, अविनाश जानुगडे, शंकरराव जाधव, स्नेहल जाधव, शोभा कदम, जयश्री बोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, सत्यजित पाटणकर आणि राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युवकांची दुचाकी रॅली काढली.बच्चू दा दांनालिफ्ट..!माजी उपमुख्यमंत्री अजित पवार कºहाडातून नाष्टा उरकून पुढे जाताना त्यांनी आवर्जून पाटणचे नेते सत्यजित पाटणकर यांना गाडीत शेजारी बसवून घेतले. त्यामुळे पाटणकरांच्या एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री शशिकांत शिंदे असे चित्र होते. अजित पवार बच्चू दादांना लिफ्ट देणार का, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.नवसानं पोरं झालं अन् मुके घेऊन मारलं : धनंजय मुंडेनवस करून सत्तेवर आलेल्या भाजप-सेना शासनाने डाळी, ऊस, पेट्रोल, खतांचे दर वाढविले; पण जनतेला कळू दिले नाही. भाजपची अवलाद लय भारी असून, मोदीच्या अच्छे दिनाच्या इंजेक्शनने हू नाही आणि चू नाही. ये अच्छे दिन नहीं होते वो महसूस करना पडता है, अशी खिल्ली उडवून या ‘नवसानं पोर झालं आणि मुके घेऊन मारलं’ अशी सत्ताधारी राज्यशासनाची अवस्था झाली असल्याची टीका धनंजय मुंडे यावेळी केली.