लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : उत्सव काळात मंडप घालण्याचे काम मंडप कॉन्ट्रॅक्टर करीत असले तरीही मंडपासाठी खोदलेले खड्डे मुजविण्याची जबाबदारी त्यांच्याकडे नसते. मात्र, ‘लोकमत’ने सुरू केलेल्या इनिशिएटिव्हला प्रतिसाद म्हणून गतवर्षापासून सामाजिक जाणिवेचे भान ठेवून स्वत: खड्डे मुजवित असल्याचे मंडप व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याविषयी ‘लोकमत’शी बोलताना मंडप व्यावसायिक दत्ता शिंदे म्हणाले, ‘गरज भासली तरच मंडपासाठी खड्डा खणला जातो. अन्यथा लोखंडी चौकोनी खांबावर मंडप उभा करून त्याला शेजारील घरांचा आधार दिला जातो. त्यामुळे शक्यतो रस्त्यांवरील खड्डे पडू नयेत, याची दक्षता आम्ही घेत आहोत.’उत्सवाचे आगमन झाल्यानंतर रस्त्यामध्ये मांडवासाठी खोदण्यात येणारे खड्डे नंतर कोण मुजविणार? असा प्रश्न पडतो. अनेकदा विसर्जन झाल्यानंतर खड्डे तसेच राहतात. त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांवर टीका होते. यंदा मात्र, ही परिस्थिती बदलण्यासाठी ‘लोकमत’ने गणेश मंडळांना ‘आपले खड्डे आपणच मुजवू या...’ असे आवाहन केले होते. ‘लोकमत’च्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन ‘आम्ही काढलेले
खड्डे आम्हीच मुजविणार,’ असा निर्धार अनेक गणेश मंडळांनी केला होता.उत्सव काळात मंडप उभारणीची जबाबदारी मंडप कॉन्ट्रक्टरकडे असते. उत्सवानंतर तो मंडप काढून नेण्याचे कामही तेच करतात. मात्र, मंडप काढल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या खड्ड्यांची जबाबदारी कोणाचीच नव्हती. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा काही मंडप डेकोरेटर्सनी मंडप काढल्यानंतर खड्डा स्वत: मुजविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार शहरातील विविध ठिकाणी असलेले मंडप काढल्यानंतर त्याठिकाणी माती आणि छोटे दगड घालून हे खड्डे मुजविण्यात आले. शहरात विविध ठिकाणी मुख्य रस्त्यावरील हे चित्र पाहून सातारकरही सुखावले होते.‘लोकमत’च्या भूमिकेचे स्वागतआधुनिकतेचा स्वीकार करण्याबरोबरच पारंपरिक बाज राखण्याची भूमिका ‘लोकमत’ने कायम जोपासली आहे. समस्या मांडताना त्याचे समर्थ उपाय देण्याची खासियत ‘लोकमत’ची आहे. त्यामुळे मंडपासाठी रस्त्याची चाळण नको, ही भूमिका कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली. ‘लोकमत’च्या प्रत्येक हाकेला साद देणाºया सातारकरांनी यावेळीही स्वत:च मंडपाचे खड्डे मुजविण्यासाठी भूमिका घेतली. विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर आणि गुरुवारीही शहरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वत: खड्डे मुजविल्याचे चित्र पाहायला मिळाले.फ्रॅब्रिकेटेड लोखंडी पिलरमुख्य आणि वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडू नयेत, म्हणून अनेक मंडपवाल्यांनी फॅब्रिकेटेड लोखंडी पीलरचा वापर करून गणेशोत्सवासाठी मंडप उभारला होता. लोखंडी अँगलच्या साह्याने या मंडपाच्या छताला आधार दिला जातो. तर जमिनीवरही नट बोल्टच्या साह्याने पाया तयार केला जातो. पूर्णपणे लोखंडी आणि नटबोल्टच्या मदतीने तयार करण्यात आलेले हे मंडप चांगलेच मजबूत असतात. यामुळे रस्त्यावर खोदकाम करण्याची गरज भासत नाही.फॅब्रिकेटेड लोखंडी पीलरच्या साह्याने सातारा शहरातील भारत माता गणेशोत्सव मंडळ, मारवाडी भुवन गणेशोत्सव मंडळ आणि श्रीमंत व्यापारी गणेशोत्सव मंडळ या मंडळांनी मंडप उभा केला. उत्सव संपल्यानंतर येथे मंडप उभा राहिल्याच्या कोणत्याही खुणा दिसत नाहीत.