खंडाळा : ‘भारतीय शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक, स्त्रीला चूल आणि मूल यासह शिक्षणाची कवाडे उघडी करून देणाऱ्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून अविष्कार फाैंडेशन इंडिया या संस्थेतर्फे खंडाळा तालुक्यातील मुरलीधर पवार व सुजाता पवार या दाम्पत्याला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .
निपाणी येथील रोटरी क्लब हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविष्कार फौंडेशन इंडियाचे संस्थापक संजय पवार, निपाणीचे नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा नीता बागडे, पोलीस उपनिरीक्षक सुजाता राठोड तसेच फाैंडेशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मुरलीधर पवार व सुजाता पवार या दाम्पत्याने शिक्षण क्षेत्रात खंडाळा व वाई तालुक्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुलांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी विविध उपक्रम राबवून त्यांचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. याबद्दल विविध क्षेत्रांतून त्यांचे कौतुक होत आहे.
...........................
०७ ननावरे सर
फोटो मेल केला आहे .