शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

गिरवीच्या डाळिंबाला धोम-बलकवडीचे पाणी

By admin | Published: September 13, 2015 9:48 PM

अखेर रामराजेंचा शब्द खरा : १२१ किलोमीटर अंतर पार करून प्रकल्प यशस्वी

वाठार-निंबाळकर : धोम-बलकवडी धरणाचे पाणी अखेर फलटण तालुक्यातील गिरवी या गावी पोहोचले. तब्बल २० वर्षांपूर्वी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडीचे पाणी तत्कालीन आमदार चिमणराव कदम यांच्या बागेला देणार असल्याचा शब्द दिला होता. तो अखेर खरा-खुरा ठरला. फलटण तालुक्यातील १२८ गावांपैकी ३६ गावे नीरा उजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात आहेत. ती वगळता उर्वरित गावे कायम दुष्काळी म्हणून संबोधली जात. त्या गावांच्या शेतीपाणीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांनी आपल्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात फार परिश्रम घेतले होते; मात्र त्यांना यश आले नव्हते.१९९५ मध्ये रामराजे नाईक-निंबाळकर यांनी याच पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून आपण चिमणराव कदम यांच्या डाळिंबाच्या बागेला पाणी देणार, असे प्रचारात वेळोवेळी अश्वासन दिले होते.१९९५ मध्ये युती शासनाला अपक्ष आमदारांची गरज सत्तेसाठी होती. ही गरज ओळखून रामराजेंनी अपक्ष आमदार एकत्रित करून पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करण्यास भाग पाडले. धोम-बलकवडी व नीरा-देवघर ही दोन धरणे बांधून घेतली. पुढे सत्तांतर होऊन काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले. यावेळी रामराजेंनी पाणी प्रश्नासाठी अथक परिश्रम घेऊन धोम-बलकवडी धरणाचे काम पूर्ण करून व प्रत्यक्ष कालव्याचे काम सुरू करून धोम-बलकवडीचे पाणी ठिकठिकाणी बोगदे पाडून फलटण तालुक्यात आणले.फलटण तालुक्यात पाणी आल्यानंतर आदर्की येथे दिवंगत चिमणराव कदम व शंकरराव जगताप तसेच माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले होेते. वेगवेगळ्या अडचणींमुळे गिरवीपर्यंत पाणी येण्यासाठी वेळ लागत होता. तरीही रामराजेंना चिमणराव कदम यांच्या हस्ते कार्यक्रमांमध्ये गिरवी गावात पाणी पूजन घ्यायचे होते. सध्या गिरवी गावात ‘गुरवदरा’ नावाच्या तलावात पाणी सोडले आहे; मात्र, गावात आलेले पाणी पाहण्यासाठी चिमणराव कदम हवे होते. कारण या पाण्यासाठी त्यांनी ही अथक प्रयत्न केले होते, अशी हळहळ आज गिरवीकर ग्रामस्थांनी व्यक्त केली. (वार्ताहर)शेतकऱ्यांमध्ये आनंद गिरवी गावात १२१ किलोमीटर अंतरावर धरणापासून पाणी येण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये पाणी गिरवीत पोहोचले होते. सध्या फलटण तालुक्यात तीव्र दुष्काळ असून, गिरवी ग्रामस्थांनी चारा छावणीची मागणी तहसीलदार यांच्याकडे केलेली आहे. यात धोम-बलकवडीचे पाणी गिरवी गावात पोहोचल्याने शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मात्र जुनी जाणते मंडळी आपापसात बोलताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तालुक्यात १९९५ मध्ये आमदारकी लढविताना तालुक्यातील जनतेला दिलेला शब्द पूर्ण करून स्वर्गीय ‘चिमणराव कदम यांच्या डाळिंब बागेला पाणी दिले,’ अशी आदराची भावना व्यक्त केली.