तांबवे येथील आठवडा बाजार शनिवारी असतो. आठवडा बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी व्यापाऱ्यांना ग्रामपंचायतीच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याची सूचनाही वारंवार देण्यात आली आहे. मात्र, ज्यांनी मास्क लावले नव्हते अशा व्यापाऱ्यांवर उपसरपंच अॅड. विजयसिंह पाटील, ग्रामविकास अधिकारी टी. एल. चव्हाण, कर्मचारी संजय राऊत, दिनेश मोगरे, विकास पाटील, सुभाष मदने यांनी कारवाई सुरू केली आहे. गत आठवड्यात कारवाई करून संबंधितांकडून चार हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
तांबवे हे विभागातील महत्त्वाचे गाव आहे. या ठिकाणी दररोज परगावच्या ग्रामस्थांची वर्दळ असते. आठवडी बाजारादिवशी ही वर्दळ कित्येक पटीने वाढते. त्यामुळे ग्रामपंचायतीने कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून, अचानक केल्या जाणाऱ्या कारवाईची व्यापाऱ्यांनी चांगलीच धास्ती घेतली आहे.
फोटो : २५केआरडी०२
कॅप्शन : तांबवे (ता. कऱ्हाड) येथील आठवडा बाजारात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्यावतीने कारवाई करण्यात आली. (छाया : दीपक पवार)