पाचगणी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भाजी मंडईतील व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करण्यासाठी पाचगणी नगरपरिषदेने सूचना केली आहे. त्यामुळे भाजी मंडई बंद करण्यात आली. कोरोना नियमांचा प्रथम फटका भाजी व्यापाऱ्यांना बसल्याने चाचणी केल्यावरच भाजी मंडई सुरू होणार आहे.
येथील भाजी मंडईतील व्यावसायिकांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पाचगणी नगरपरिषद प्रशासनाने कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी कोणत्याही व्यावसायिकाने न केल्याने व्यवसाय बंद ठेवण्याची संक्रांत व्यावसायिकांवर आली आहे. त्यामुळे संपूर्ण भाजी काही क्षणांत लॉकडाऊन झाली. रेलचेल चालू असणारी मंडई लॉकडाऊन झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली, तर अनेक व्यावसायिकांनी चाचणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले.
दरम्यान, कोरोना संसर्गास प्रतिबंध घालण्यासाठी सर्वच व्यावसायिकांनी आपली कोरोना चाचणी करावी. तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
फोटो आहे...