.....................
साताऱ्यात गत तीन महिन्यांपूर्वी दुचाकी चोरट्यांनी धुडगूस घातला होता. शहरातून रोज किमान चार दुचाकी चोरीला जात होत्या. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी अधिकच वाढली होती. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर हे चोरीचे प्रमाण अचानक कमी झाले. त्यामुळे पोलिसांना दिलासा मिळाला. मात्र, तीन महिन्यांपूर्वी चोरीस केलेल्या वाहनांचा तपास मात्र अद्यापही ठप्प आहे. चोरीस गेलेली दुचाकी पोलिसांना सापडेल, या आशेवर अनेक दुचाकीस्वार आहेत.
............
सध्या कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. सकाळच्या सुमारास शहरामध्ये अनेक ठिकाणी आंबे विक्रेते गिऱ्हाइकाच्या प्रतीक्षेत बसलेले पाहायला मिळत आहेत. काही लोक घराबाहेर पडत आहेत. मात्र, ते आंबे विक्री करत नाहीत. जे करत आहेत, ते घरात आहेत, अशामुळे विक्रेत्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. सलग दुसऱ्या वर्षीही आंब्याचा हंगाम वाया गेल्याने शेतकरी वर्गासह व्यापारी अक्षरश: हतबल झाले आहेत.