शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
3
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
5
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
6
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
7
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
8
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
9
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
10
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
11
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
12
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
13
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
14
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
15
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
16
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
17
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
18
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
19
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
20
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल

भल्या पहाटे डोंगरावर ग्रामस्थांची धडपड !

By admin | Published: April 19, 2017 3:07 PM

वॉटर कप जिंकणारच : जायगावकरांचा निर्धार; गट-तट विसरून गावकरी एकत्र, पाणीदार गावासाठी कंबर कसली

आॅनलाईन लोकमतऔंध (जि. सातारा), दि. १९ : जानेवारी, फेब्रुवारी महिना आला की ओढे, नाले आटतात. साडेतीनशे, चारशे फुटावरील कुपनलिका कोरड्या पडतात. पाणीटंचाईमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून टँकरशीही नाते दृढ झालेले. त्यामुळे पाणीटंचाईचे प्रचंड चटके सोसलेले जायगावकर पाणी बचतीसाठी कमालीचे जागृत झाले. त्यातूनच गाव पाणीदार करण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थ एकवटले आहेत. भल्या पहाटे ग्रामस्थ डोंगरावर जाऊन काम करीत आहेत. जायगावला मोठी नैसर्गिक देणगी लाभली आहे. उत्तर दिशेचा अपवाद वगळता तीन्ही बाजुंनी डोंगर आहे. पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पाणी अडवले नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाहून जाते. दरवर्षी गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गेल्या चार वर्षांत कूपनलिका खोदून काही जणांनी पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पाण्याची पातळी खालावल्यामुळे कुपनलिका कोरड्या पडल्या असून पाण्यासाठी घातलेले लाखो रुपये वाया गेले आहेत. पाणीटंचाईमुळे हैराण झालेल्या जायगावकरांना पाण्याचे महत्त्व समजल्याने गाव व परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब न् थेंब जमिनीत मुरवून गाव पाणीदार करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेतला. या जलसाक्षर चळवळीत सहभागी होण्यासाठी लहानांपासून आबालवृध्द सरसावले आहेत. भल्या पहाटे टिकाव, खोरे, पाटी घेऊन लोक डोंगर गाठतात. पाणी फौंडेशनची गावात धूम असून ओढ्याचे खोलीकरण, गाळ काढणे, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपणासाठी खड्डे काढण्यात आले आहेत. डोंगर उतारावरुन वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी (डिप सीसीटी) समतल चर खोदण्याचे काम सुरू आहे. गाव पाणीदार करुन वॉटर कप जिंकायचा या इषेर्ने झपाटलेले ग्रामस्थ गावातील राजकीय मतभेद गटतट बाजूला सारून खांद्याला खांदा लावून पाण्यासाठी राबत आहेत. शेकडो ग्रामस्थ डोंगरावर समतल चर खोदण्याचे काम करीत असल्याने डोंगर माणसांनी गजबजून गेले आहेत. (वार्ताहर) शासनावर अवलंबून न राहता देणगी...पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेत ग्रामस्थांनी ऐक्याची वज्रमूठ आवळली असून श्रमदानाबरोबर लोकवर्गणीतून गाळ काढणे, खोलीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. निधीसाठी शासनावर अवलंबून न राहता सर्व स्तरातून लोकांनी देणगी गोळा करून कामाला वेगाने सुरूवात केली आहे. पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग...पाणी फौंडेशनच्या कामाला गती आल्याने गावागावात पाणीदार चळवळ उभी राहिली आहे. या चळवळीला बळ देण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधीसुध्दा सरसावले आहेत. पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, तहसीलदार पवार-काडीर्ले याशिवाय औंध पोलीस स्टेशनची टीमसुध्दा या पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेत सहभागी झाली आहे.