कोरोनाचे संकट मोठे आहे. त्यावर मात करण्यासाठी प्रशासन निर्बंध घालत आहे. जनतेनेही प्रवास व गर्दी टाळत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी मालखेड (ता. कऱ्हाड) येथील सातारा व सांगली जिल्ह्याची सीमा असलेला नाक्यावर जाऊन पोलीस अधिकार्यांशी चर्चा केली. होणाऱ्या कामकाजाबद्दल माहिती घेतली .त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते .
मंत्री देसाई म्हणाले, राज्यात जिल्हा प्रवास बंदी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा असेल व त्यांनी पूर्वपरवानगी घेतली असेल, तरच त्यांना जिल्हा बाहेर व जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे. याची दखल जनतेने घ्यावी.
जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. त्यांच्यासाठी मास्क, फेसशिल्ड, हॅन्डसॅनिटायझर या सर्व बाबी पोलीस दलाच्या माध्यमातून पुरवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पहिला लाटेदरम्यान कर्तव्य बजावत असणाऱ्या अनेक पोलिसांना बाधित व्हावे लागले होते. तेसुद्धा आपल्यापैकीच एक माणूस आहेत, याचे भान जनतेने ठेवावे व त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री देसाई यांनी यावेळी केले.
फोटो :