सातारा : कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडॉऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडॉऊन तत्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.शनिवारपासून सक्तीचे लॉकडॉऊन सुरू झाले आहे. या विरोधात खासदार उदयनराजे यांनी सातारा शहरात शनिवारी अनोखे भीक मांगो आंदोलन केले. जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडॉऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ञ सांगतो. त्याचे स्पष्टीकरण आधी जनतेला व्हायला हवे. आता केलेला लॉकडॉऊन अत्यंत चुकीचा आहे. लोक नियम पाळणार नाहीत. उद्यापासून नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.खासदार, आमदार यांच्याकडे जास्त पैसा आहे. लोकांनी त्यांच्या घरांवर दरोडा टाकावेत, असा अनाहूत सल्ला देखील उदयनराजेंनी दिला. लोक संतप्त आहेत आता भुकेने व्याकूळ देखील होऊ लागले आहेत. त्यामुळे भुकेच्या त्रासापायी लोक पोलिसांवर देखील हात उचलायला आता कमी पडणार नाहीत, असे देखील त्यांनी ठणकावले.सातारकरांच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झालेला आहे. तसेच सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी सामान्य सातारकर करत आहेत.
उदयनराजेंचे साताऱ्यात अनोखे भीक मांगो आंदोलन, म्हणाले, लोक भुकेपोटी दरोडा टाकतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 2:56 PM
CoronaVirus Udayanraje : कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडॉऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडॉऊन तत्काळ उठवा अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.
ठळक मुद्देलोक भुकेपोटी दरोडा टाकतील : उदयनराजे साताऱ्यात अनोखे भीक मांगो आंदोलन, प्रशासनाला दिला इशारा