लोकांची मानसिकता निम्मे आजार बरे करतेसकस आहार, विश्राती अत्यंत गरजेचीचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादकोणत्याही रुग्णाला औषधोपचाराची गरज असतेच, त्याही पेक्षा त्याला आधाराची गरज असते. त्याची मानसिकता बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. आपण यातून बरे होणार, हा आत्मविश्वास त्याला द्यायला हवा - डॉ. ज्ञानेश्वर हिरासदत्ता यादव ।लोकमत न्यूज नेटवर्कस्वाईन फ्लूचं केवळ नाव जरी उच्चारलं तरी अनेकांची पाचावर धारण बसते. या रोगाविषयी आजही समाजात कमालीची भीती आहे. त्यामुळे रुग्णावर योग्य उपचार झाले तर रुग्ण दगावणार नाहीत. यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. ज्ञानेश्वर हिरास यांनी जनजागृतीचा वसा घेतला आहे. आरोग्य केंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना तसेच खासगी हॉस्पिटलमधीलडॉक्टरांनाही मोजक्या शब्दांमध्ये काही महत्त्वाच्या टिप्स देऊन स्वाईन फ्लूला कसे सामोरे जावे, याचे सखोल ज्ञान त्यांनी दिले. या सदंर्भात त्यांच्याशी केलेली बातचित..
प्रश्न : जनजागृतीमुळे स्वाईन फ्लू आटोक्यात येईल का?उत्तर : हो नक्कीच येईल. याची लक्षणे तत्काळ ओळखता आली पाहिजेत. लोकांपर्यंत स्वाईन फ्लूची माहिती पोहोचायला हवी. सर्दी, ताप आणि घसा दुखत असलेली लक्षणे आढळल्यास ४८ तास रुग्णाला देखरेखीखाली ठेवले जाते. त्यानंतरही बरे वाटले नाही तर टॅमी फ्लूच्या गोळ्या दिल्या जातात. याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे रुग्णाने घाबरून जाऊ नये. मानसिकता बळकट करणे महत्त्वाचे आहे. तसेच सकस आणि योग्य आहार घेऊन विश्रांती घेणे गरजेचे आहे.
प्रश्न : आतापर्यंत किती डॉक्टरांना स्वाईन फ्लूची प्राथमिक माहिती दिली?उत्तर : जिल्हा परिषदेमध्ये सव्वाशे, सिव्हिलमध्ये ४० डॉक्टरांना तसेच ३३ खासगी डॉक्टरांनाही मार्गदर्शन केले आहे. यामुळे सजगता येईल आणि रुग्णांवर वेळेवर आणि योग्य उपचार होतील, अशी अपेक्षा आहे.
प्रश्न : स्वाईन फ्लूसाठी कोणी व काय काळजी घ्यायला हवी?उत्तर : स्वाईन फ्लू शक्यतो इतर आजार असलेल्या लोकांना पटकन होत असतो. त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. ज्यांची प्रतिकार शक्ती चांगले असते. त्यांना स्वाईन फ्लू शक्यतो होत नाही. आजार बरा होणे, हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असते. निम्मे आजार हे मानसिकतेमुळे बरे होतात.
बेड रेस्ट गरजेचीच..कोणताही आजार उद्भवल्यास शक्यतो बेड रेस्ट गरजेची असते. या काळात रुग्णाला जेवण जात नाही. परिणामी प्रतिकार शक्ती कमी होते. त्यामुळे आजार जास्त वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच डॉक्टर रुग्णांना आठ दिवस तरी बेड रेस्टचा सल्ला देतात. मात्र, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हे अनेकांना शक्य होत नाही.
सलग तीन महिनेडॉ. ज्ञानेश्वर हिरास हे एमबीबीएस असून, त्यांनी पॅथॉलॉजीचा डिप्लोमा केला आहे. नाशिक येथून त्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात बदली झाली. गेल्या तीन महिन्यांपासून ते इतर रुग्णांना तपासून स्वाईन फ्लूबाबत मार्गदर्शन करत आहेत. केवळ उपचार करून ते रुग्णाला जाऊ देत नाहीत. रुग्णाचे समूपदेशनही करत आहेत. दिवसाला पन्नास रुग्ण तपासण्याची मर्यादा असताना चारशे ते पाचशे रुग्ण तपासावे लागतात.