जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान मिळाले आहे. जिल्ह्यातून सह्याद्रीच्या पर्वत रांगा गेल्या आहेत. या पर्वतरांगांमध्ये अद्भुत नजराणा मानवाला पाहावयास मिळतो. महाबळेश्वरमधील असंख्य पर्यटन स्थळे, पाचगणीचा टेबल लॅण्ड जगाच्या नकाशावर शेकडो वर्षांपूर्वीच पोहोचली आहे. त्यामुळे या ठिकाणाला जगभरातील पर्यटक भेटी देतात. त्याप्रमाणे साताऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या कास पठारावर दरवर्षी दर पंधरा दिवसाला विविध रंगाचे, आकारातील फुलं पाहावयास मिळतात. एकदा पाहिलेली फुलं पुढच्या वेळेस नसतात. त्यामुळे हौशी पर्यटक, निसर्गप्रेमी, वनस्पती अभ्यास व याठिकाणी येतात. येथील निसर्गाच्या अद्भूत नजराणाची दखल घेऊन युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने पर्यटकांची मांदियाळी सुरू झाली. अवघ्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर या सात दिवसांमध्ये लाखो पर्यटक येऊन जातात. पण येथील पर्यटन हे केवळ दोन महिन्याचे हंगामी राहिलेले नाही. हे जगासमोर येण्याची गरज आहे. अनेक ठिकाणे दुर्लक्षित आहेत. पण ते आपणाला बारमाही पाहता येऊ शकतात.
हंडा घागर पॉईंट : पठारावर नैसर्गिकरीत्या अस्तित्वात असलेल्या या पॉईंटला, त्याच्या आकारानुसार जुनी अनुभवी लोक ‘हंडा घागर’ म्हणतात. यावर माणसाच्या पायाचे ठसे तसेच घाटाई, वनराई, देवराई दिसते.
स्वयंभू गणेश पॉईंट : गणेशाचा आकार प्राचीन काळापासून असलेली दगडात स्वयंभू मूर्ती दिसून येते. या मूर्तीची जुन्या अनुभवी लोकांकडून माहिती घेतली आहे.
सज्जनगड-उरमोडी दर्शन पॉईंट : या पॉईंट वरून सज्जनगड, उरमोडी धरण आपणाला पाहता येते. सूर्योदया वेळी याचे सुंदर दर्शन घडते.
जंगल व्ह्यू पॉईंट : येथून कास जंगल व कास धरणाची भिंत पाहायला मिळते
दगडी कमान पॉईंट : पुरातन काळातील नैसर्गिक तयार झालेली आहे. याला मंडप असेही म्हणतात. शेजारी छोटी गुफा, कमान आढळते. कास तलाव, जंगल दिसते. सूर्यास्त पाहण्यास सुंदर ठिकाण आहे.
कण्हेर व्ह्यू पॉईंट : मेढा परिसर, कण्हेर धरण, मेरू लिंग पर्वत रांगा दिसतात.
कुमुदिनी गुफा पॉईंट : शिवकालीन राजमार्गावर कुमुदिनी तलाव समोर गुफा. वन्यप्राण्यांच्या निवाऱ्याचे ठिकाण आहे.
सर्व फोटो २५संडे/२५कास/