ठळक मुद्देसंपामुळे प्रवाशांची गैरसोय राज्य शासनाची सर्व खासगी वाहनांना वाहतुकीस परवानगी जोपर्यंत संप सुरू असेल तोपर्यंतच निर्णय लागू संपामुळे खासगी वाहनधारकांची चांदी
सातारा , दि. १७ : एसटी महामंडळाने पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व खासगी वाहनांना राज्य शासनाने वाहतुकीस परवानगी दिली आहे. त्यामुळे या संपामुळे खासगी वाहनधारकांची चांदी झाली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपामुळे सर्व एसटी बसेस बसस्थानकातच उभ्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.
हा बेमुदत संप असल्याने प्रवाशांची आणखीनच गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने खासगी वाहनधारकांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, जोपर्यंत हा संप सुरू असेल तोपर्यंतच हा निर्णय लागू असणार आहे,अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी दिली.