शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पेट्रोल चोरी प्रकरण -सहा महिन्यांपासून सुरु आहे चोरीचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 3:33 PM

Crime News Sataranews- लोणी - मिरज जाणारी हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईप लाईन सहा महिन्यापूर्वी बिबी - घाडगेवाडी गावच्या हद्दीत दहा फुटाचे भुयार पाडून पेट्रोल चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर पुन्हा फक्त दोन कि. मी. अंतरावर पाइपला होल पाडून समांतर पाईप टाकून चोरीचा प्रयत्न झाल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळीबरोबर अन्य काही जणांचे सहकार्य असल्याची शंका व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे पेट्रोल चोरी प्रकरण -सहा महिन्यांपासून सुरु आहे चोरीचा प्रयत्नदहा फुटाचे भुयार काढून समांतर पाईप लाईन टाकण्यासाठी खोदकाम

सुर्यकांत निंबाळकरआदर्की /सातारा : लोणी - मिरज जाणारी हिंदुस्थान पेट्रोलियमची पाईप लाईन सहा महिन्यापूर्वी बिबी - घाडगेवाडी गावच्या हद्दीत दहा फुटाचे भुयार पाडून पेट्रोल चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. त्यानंतर पुन्हा फक्त दोन कि. मी. अंतरावर पाइपला होल पाडून समांतर पाईप टाकून चोरीचा प्रयत्न झाल्याने यामागे आंतरराष्ट्रीय टोळीबरोबर अन्य काही जणांचे सहकार्य असल्याची शंका व्यक्त होत आहे.हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची लोणी ते मिरज पर्यंत पेट्रोल पाइपलाइन टाकण्याचे काम १५ वर्षापूर्वी झाले. त्यावेळी जलदगतीने काम करताना पाइपलाइन जमिनीत पाच ते सात फुटापर्यंत खोल गाडली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या जामिनी ताब्यात घेतल्या आहेत. पण, जमिनीच्या मध्यभागातून पाईप गेल्याने शेतकरी मशागत करुन पिकांची पेरणी करतात.

त्याचाच फायदा चोरट्यांनी घेऊन सासवड ( झणझणे ) ता . फलटण येथे पाईपलाईनला होल पाडून संमातर पाइपलाइन टाकून चोरीचा प्रयत्न केला. परंतू व्हॉल्व्हला गळती लागून पेट्रोल जमिनीत मुरुन विहिरीत उतरल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. हजारो लिटर पेट्रोल शेतात वाहून विहिरीत पाझरले. त्यामुळे पाणी दूषित होऊन जलचर प्राण्यांचा विहिरीत मृत्यू होऊन मासे , बेडकांचा खच पडला आहे. त्यामुळे शेतकरी, जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.या घटनेची नोंद पोलीसात झाली आहे. याच पेट्रोल पाईपलाईनला बिबी गावच्या हद्दीत पाझर तलावाखाली वेडया बाभळीच्या बुंध्याखालून अंदाजे १० ते १५ फूट भुयार खोदकाम करुन पाईपलाईन फोडण्या प्रकार अगोदरच उघड झाल्याने चोरीचा प्रकार झाला नाही अशी नोंद लोणंद पोलीस स्टेशनला झाली आहे.पाइपलाइनला होल पाडूनही कंपनीला पत्ताच नाहीपेट्रोल पाईपलाईन शेजारी खुदाई किंवा पाईपलाईन शेजारच्या झाडाच्या फांद्या तोडल्या तरी अलार्म वाजतो व संबधीत ठिकाणी यंत्रणा पोचते मग पाईपलाईनला होल पाडून संमातर पाईप टाकली. ती ही जमिनीखाली चार ते पाच फूट खोल. मग अलार्म का वाजला नाही याचा शोध घेतला पाहिजे.सहा महिन्यात दोन वेळा चोरीचा प्रयत्नया पाइपलाइनमधून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न दोन वेळा झाला आहे. तरी देखील दोन्ही वेळेस पोलीस स्टेशनला अज्ञातावर गुन्हा दाखल झाला. मात्र, त्याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली नाही. यापूर्वीच ही माहिती मिळाली असती तर दुसरा प्रयत्न झाला नसता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPetrolपेट्रोलSatara areaसातारा परिसर