शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दिव्यांविनाच धावते ‘पेट्रोल व्हेईकल’! अपघाताची शक्यता : ब्रेक, इंडिकेटर, पार्किंग लाईटस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 10:03 PM

सातारा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची ‘पेट्रोल व्हेईकल’ फुटक्या दिव्यांनीच रात्री-अपरात्री महामार्गावर फिरताना दिसते. या वाहनाचे दिवेच गायब असल्याने रात्रीच्यावेळी या वाहनामुळेच मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महामार्गावर कुठलाही अडथळा आल्यास अपघात होऊ शकतो, हे लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणामार्फत पेट्रोलिंग वाहनांची सुविधा केलेली आहे. रस्त्यावर कुठलाही प्राणी मरून पडल्यास त्यामुळे ...

सातारा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची ‘पेट्रोल व्हेईकल’ फुटक्या दिव्यांनीच रात्री-अपरात्री महामार्गावर फिरताना दिसते. या वाहनाचे दिवेच गायब असल्याने रात्रीच्यावेळी या वाहनामुळेच मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.महामार्गावर कुठलाही अडथळा आल्यास अपघात होऊ शकतो, हे लक्षात घेऊन महामार्ग प्राधिकरणामार्फत पेट्रोलिंग वाहनांची सुविधा केलेली आहे. रस्त्यावर कुठलाही प्राणी मरून पडल्यास त्यामुळे मोठे अपघात होऊ शकतात.

मात्र, महामार्गावर धावणारे एमएच ११ टी ८७०४ हे वाहन सध्या जागोजागी फिरताना दिसते. या वाहनाच्या ‘बॅक लाईट’ तुटलेल्या आहेत. पाठीमागच्या बाजूला ब्रेक लाईट, पार्किंग लाईट व इंडिकेटर असे तीन लाईटस असतात. मात्र, मागील बाजूच्या लाईटस फुटल्या आहेत. आतील दिवेही तुटून पडले आहेत. त्यामुळे वाहन रस्त्याकडेला पार्क केले तर ते रात्रीच्यावेळी मागून येणाऱ्या वाहनाला दिसू शकत नाही. अथवा महामार्गावरून धावत असताना अचानकपणे वळले तरी मागील वाहन चालकाला इंडिकेटरही दिसत नसल्याने अपघात होऊ शकतो.

ब्रेक लाईटही गायब असल्याने अचानक अडथळ्यावेळी हे वाहन थांबले तर मागील वाहनधारकाला पुढील धोका लक्षात न आल्याने या वाहनाला धडक बसू शकते. बहुतांशपणे रात्रीच्या वेळेतच महामार्गावर या वाहनाच्या फेºया होतात. या वाहनावर धडकेच्या खुणाही जागोजागी बघायला मिळतात.रस्त्यावरून जाणारे प्रत्येक वाहन नियमात पाहिजे, अशी अपेक्षा असते. वाहतूक पोलीस, आरटीओ अधिकारी वाहनाला आरसा नसेल तरी दंडात्मक कारवाई करतात. वाहनाला इंडिकेटर नसेल तरीही दंड केला जातो. मग नॅशनल हायवेच्या वाहनांना नियम नाहीत काय? हे वाहन महामार्गावर राजरोसपणे फिरत असले तरी त्या वाहनाची तपासणी केली जात नसल्याचे निदर्शनास येते.

इतर वाहनधारकांनी नियम न पाळल्यास महामार्गावर जागोजागी अडवले जाते. सर्व कागदपत्रे असली अथवा वाहन सर्व नियमांत बसत असले तरी त्यांच्याकडून चवली-पावली वसूल केली जातेच. हे वास्तव असताना पेट्रोलिंगच्या वाहनाने सर्व नियम वेशीला टांगले आहेत. त्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष का? असा सवाल वाहनचालक विचारत आहेत.हेल्पलाईन नंबरही नाहीया वाहनावर दर्शनी भागामध्ये हायवे हेल्पलाईन नंबर लिहिणे आवश्यक आहे. मात्र या वाहनाच्या मागे हेल्पलाईन नंबर लिहिलेल्या आढळत नाही.जोपर्यंत हायवेला पेट्रोलिंग करणाºया गाड्या आरटीओचे नियम पाळत नाहीत, तोपर्यंत हायवे अपघातमुक्त होऊ शकत नाही. किमान ब्रेक लाईट तरी पाहिजेत. रेडियम पाहिजे, हेल्पलाईनचा नंबर या वाहनावर पाहिजे. याबाबत योग्य दखल घेणे गरजेचे आहे.- चिन्मय कुलकर्णी, अध्यक्ष, संकल्प इंजिनिअरिंग व सामाजिक संस्था 

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा