शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

फलटणनं जपलाय प्रदीर्घ सत्तेचा वारसा!

By admin | Published: August 31, 2015 8:59 PM

जगात राजघराणं सातवे : पणजोबा मुधोजीराजे नाईक-निंबाळकरांचा वारसा पुढे नेतायत रामराजे

सातारा : जगामध्ये सर्वाधिक काळ सत्ता गाजविणाऱ्या दहा राजघराण्यांपैकी ‘टॉप टेन’मध्ये फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याचा सातवा क्रमांक लागलाय. या घराण्यातील मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी ७ डिसेंबर १८४१ ते १७ आॅक्टोबर १९१६ असे ७५ वर्षे २५३ दिवस इतका प्रदीर्घ काळ फलटण संस्थानावर अधिराज्य गाजविले. विशेष म्हणजे, त्यांचे पणतू व विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरही आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत फलटणच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात गेल्या २५ वर्षांपासून प्रभाव ठेवून आहेत.फलटण संस्थानातील नाईक-निंबाळकर घराणे पराक्रमी व इतिहास प्रसिद्ध घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे सासर, तर छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ आहे. सर्वात जास्त राज्य कारभार करणाऱ्या जगातील दहा राज्यकर्त्यांमध्ये मुधोजीराजे नाईक-निंबाळकर (चौथे) यांचा सातवा क्रमांक लागतो. त्यांच्या खालोखाल गोंदल संस्थानाचे भगवतसिंग साहिब यांचा क्रमांक लागतो. स्वाझीलँडचे राजे सोहुजा यांनी ८२ वर्षे २५४ दिवस, लिपे संस्थानात (जर्मनी) बेर्नाड यांनी ८१ वर्षे २३४ दिवस, विल्यम चौथा हेनबर्ग स्कूलशिगिन (रोमन साम्राज्य) यांनी ७८ वर्षे २४३ दिवस, हेन्रीच अकरावा ग्रीज संस्थान यांनी ७७ वर्षे १०३ दिवस, इद्रिस इब्नी मुहम्मद अल कादरी, मलेशिया यांनी ७६ वर्षे २३९ दिवस राज्य कारभार पाहिला. यांच्यानंतर भारतातील फलटण संस्थानच्या मुधोजीराजेंनी भारतातील सर्वाधिक काळ राज्य कारभार केला आहे.रामराजेंचे आजोबा मालोजीराजे हेही बरीच वर्षे आमदार व मंत्री होते. त्यानंतर हाच वारसा रामराजे नाईक-निंबाळकर समर्थपणे पुढे नेत आहेत. क्रिकेटमध्ये पारंगत असणाऱ्या रामराजेंनी राजकारणाच्या खेळातही आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. नगराध्यक्षपदापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द विधानपरिषदेच्या सभापतिपदापर्यंत कायम टिकून आहे. नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, कृष्णा खोरे उपाध्यक्ष, पाटबंधारे मंत्री ते विधानपरिषद सभापती असा चढता आलेख रामराजेंनी राखला आहे. संजीवराजे व रघुनाथराजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात यशस्वी ठरले आहेत. (प्रतिनिधी)युतीच्या काळातही सत्ता हात जोडून...१९९५ ते १९९९ या काळात युती शासनाची सत्ता होती. याच काळात कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. रामराजेंना या महामंडळाचे उपाध्यक्षपद मिळाल्याने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा मिळाला होता. रामराजे सध्या राष्ट्रवादीतील वजनदार नेते आहेत. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यामध्ये जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्यात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या रामराजेंना राज्याचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या विधानपरिषदेचे सभापतीपद मिळाले आहे. पक्षाची सत्ता नसतानाही कधी महामंडळाचे उपाध्यक्षपद तर कधी विधान परिषदेचे सभापतीपद अशा माध्यमातून ‘नॉन स्टॉप’ सत्तेवर राहण्याचा विक्रमही रामराजेंनीच केला आहे.