सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असलेतरी बाधितांचा आकडा आता ४७ हजारांच्यावर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी दहा हजारांच्यावर रुग्ण सातारा आणि कऱ्हाड या दोन तालुक्यांत नोंद झाले आहेत. आता फलटण आणि कोरेगाव तालुक्यताील बाधित संख्या पाच हजारांच्या दिशेने सुरू आहे.जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. मे महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांचे प्रमाण मर्यादित होते. मात्र, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून बाधित संख्या शेकडोच्या घरात वाढू लागली. जुलै, ऑगस्ट महिन्यात तर कोरोना बाधितांच्या संख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. सद्य:स्थितीत दररोज १०० ते ३०० च्या दरम्यान रुग्ण निष्पन्न होत आहेत. कधी-कधी आकडा वाढतो. पण, कोरोना नियंत्रणात ठेवण्यात यश येऊ लागल्याचे दिसत आहे.जिल्ह्यात सद्य:स्थितीत ४७ हजारांवर रुग्ण झाले आहेत. तर १५६३ मृतांची नोंद झाली आहे. यामधील ५५६ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत. तर सर्वाधिक बाधितांची नोंद सातारा तालुक्यात ११,५४७ झाली आहे. त्यानंतर कऱ्हाड तालुक्यात १०३१५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर सातारा तालुक्यात ४०७ आणि कऱ्हाडला ३२६ मृतांची नोंद झाली आहे. या दोन तालुक्यात रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याचे कारण म्हणजे शहरी भागात अधिक बाधितांचे प्रमाण आढळून आले.सर्वात कमी संख्या महाबळेश्वर तालुक्यात...जिल्ह्यात सर्वात कमी कोरोनाची रुग्णसंख्या महाबळेश्वर तालुक्यात १०८५ आणि माणमध्ये १६८२ आतापर्यंत राहिली आहे. तर कोरोनाने सर्वात कमी बळी महाबळेश्वर तालुक्यातच १८ गेले आहेत. तसेच माणमध्ये ६९ बळींची नोंद झाली आहे. आतापर्यंत जावळी तालुक्यात २५८४ रुग्ण आढळून आले आहेत. तर खंडाळा २३३३, खटाव ३०५३, कोरेगाव ४१६३, पाटण १९०८, फलटण ४०२०, वाई ३६७६ असे बाधित प्रमाण आहे.
फलटण अन् कोरेगाव तालुक्यातील बाधित संख्या पाच हजारांच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2020 3:05 PM
CoronaVirus, hospital, sataranews, Satara area, phaltan सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असलेतरी बाधितांचा आकडा आता ४७ हजारांच्यावर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रत्येकी दहा हजारांच्यावर रुग्ण सातारा आणि कऱ्हाड या दोन तालुक्यांत नोंद झाले आहेत. आता फलटण आणि कोरेगाव तालुक्यताील बाधित संख्या पाच हजारांच्या दिशेने सुरू आहे.
ठळक मुद्देफलटण अन् कोरेगाव तालुक्यातील बाधित संख्या पाच हजारांच्या दिशेने कोरोना स्थिती : जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सातारा अन् कऱ्हाड तालुक्यात