फलटण : जिल्हा प्रशासनाने शनिवारी जाहीर केलेल्या अहवालानुसार फलटण तालुक्यात नवीन ११४ बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये शहरात ४१ तर ग्रामीण भागात ७३ रुग्ण सापडले आहेत. तर २ बधितांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाचा धोका वाढला असून ही बाब चिंता वाढवणारी आहे.
फलटण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रमाण वाढत चाललेले आहे. नवीन रुग्णांमध्ये फलटण शहरात रविवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, मलठण, सोमवार पेठ, कसबा पेठ, पृथ्वी चौक, काळूबाई नगर, लक्ष्मीनगर, संजीवराजेनगर, शंकर मार्केट, पुजारी कॉलनी, ब्राह्मण गल्ली, जिंती नाका, झिरपे गल्ली येथे रुग्ण आढळून आले.
ग्रामीण भागात कोळकी, तरडगाव, पाडेगाव, जाधववाडी, राजाळे, आळजापूर, आदर्की, नांदल, सासवड, सरडे, सांगवी, विडणी, नाईकबोमवाडी, ढवळेवाडी, बरड, निरगुडी, खडकी, वाठार निंबाळकर, वाखरी, ढवळ, निंभोरे, कोरगाव, अलगुडेवाडी, चव्हाणवाडी, हिंगणगाव, चौधरवाडी, शेरेचीवाडी, काशिदवाडी, विंचूर्णी, फडतरवाडी, सावंतवाडी, खुंटे, दुधेबावी, ढवळवाडी आसू, तिरकवाडी येथे नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, तालुक्यातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये फलटण शहरातील ४२ वर्षांचा पुरुष आणि ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
\\\\\\\\\\\\\\\\\\\\