फलटण : शासनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, फलटण तालुक्यात शनिवारी २०२ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात सतरा रुग्ण तर ग्रामीण भागात १८५ रुग्ण सापडले आहेत. तालुक्यात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढल्याने तालुका धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे.
फलटण तालुक्यात मध्यंतरीच्या काळात कोरोना रुग्णसंख्या चांगली कमी झाली होती; मात्र लॉकडाऊनमध्ये जसजशी शिथिलता येऊ लागली आहे तसतशी जनता बेफिकीर वागू लागली आहे. अनेकजण सोशल डिस्टन्सचे पालन करेनासे झाले आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. या सर्व गोष्टींमुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कोरोना बाधितांची संख्या दररोजचा दीडशेचा आकडा पार करत २०२ वर पोहोचली आहे. ऑगस्ट महिनापासून रोज कोरोना बाधितांची संख्या शंभरच्या वर आहे. आजअखेर या महिन्यात कोरोना बाधितांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने चिंताही वाढली आहे. अनेक हॉस्पिटलमध्ये पुन्हा रुग्ण उपचारासाठी येऊ लागले आहेत. रुग्णसंख्या वाढत चालल्याने नागरिकांनी तसेच प्रशासनाने सावधान झाले पाहिजे.
प्रशासनाकडून शुक्रवारी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात २०२ बाधित आहेत. यामध्ये ११० नागरिकांच्या आरटीपीसीआर चाचण्या व ९२ नागरिकांच्या आरएटी कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर १७ तर ग्रामीण भागात १८५ रुग्ण बाधित सापडले आहेत. यामध्ये खामगाव, खुंटे, माळेवाडी, बीबी, मिरढे, शिंदेवाडी, फडतरवाडी, सुरवडी, दऱ्याचीवाडी, वाठार निंबाळकर, वडले, तावडी, नाईकबोमवाडी, आदर्की खुर्द, अलगुडेवाडी, चिंचणी, वळवा, आंधळी, धुळदेव, घाडगेवाडी, कांबळेश्वर, मिरगाव, शिंदेनगर, निंभोरे, सांगवी, तिरकवाडी, सालपे, दुधेबावी, आंदरुड, गोखळी, बिजवडी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
बरड, मठाचीवाडी, मांडवखडक, सरडे, साखरवाडी, सोमंथळी, सस्तेवाडी, नांदल, चोपडज, पांगरी, विठ्ठलवाडी, सासवड, डोंबाळवाडी, तांबवे, तरडगाव, नांदल, जावळी या गावांत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. आदर्की बुद्रुक, मुंजवडी, निंबळक, फडतरवाडी येथे प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत. कुरवली बुद्रुक, सोनगाव, पाडेगाव, साठे, चौधरवाडी, येथे प्रत्येकी चार तर काळज, कोळकी, ढवळ, मुरुम येथे प्रत्येकी पाच रुग्ण आढळून आले. हिंगणगाव येथे सहा तर गिरवी, तडवळे, जाधववाडीत प्रत्येकी सात रुग्ण आढळले. गुणवरेत नऊ, राजुरीत अकरा तर विडणीत २१ रुग्ण आढळून आले.